Fact Check: सोशल मीडियावर फिरणाऱ्या धारावीतल्या 'त्या' VIDEO मागील हे आहे सत्य

Fact Check: सोशल मीडियावर फिरणाऱ्या धारावीतल्या 'त्या' VIDEO मागील हे आहे सत्य

धारावीत हातावर पोट असलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. लॉकडाऊनमुळे येथील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 एप्रिल: आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली धारावी आता कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरली आहे. धारावीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. धारावी येथून दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या मरकजला गेलेले तबलिगी जमातच्या लोकाना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे धारावीत भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यात सोशल मीडियावर काही दिवसांपासून धारावीतील एक व्हिडीओ फिरत आहे. या व्हिडीओ आम्ही पडताळणी केली. त्यात सत्य समोर आलं आहे.

हेही वाचा..6 महिन्याच्या बाळाने जिंकला कोरोनाचा लढा; VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू

धारावीत हातावर पोट असलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. लॉकडाऊनमुळे येथील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे धारावीतील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून पोटासाठी वनवन फिरत आहे. धारावीतल्या 90 फूट रोडवर जेवणासाठी धारावीकरांनी मोठी रांग लावली आहे, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आधीच धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रस्त्यावरील लोकांची तोबा गर्दी पाहून अनेकांनी सोशल मीडियावर धारावीवर आणि जेवण वाटणाऱ्यांवर सडकून टीका केली. धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आणि सरकार म्हणतय आम्ही सर्वांच्या पोटापाण्याची सोय केली आहे. तर मग एवढी मोठी गर्दी का, असा सवाल नेटकरांनी सरकारला केला होता. एवढेच नाही तर अनेक प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्तही प्रसिद्ध केलं. त्यामुळे व्हायरल व्हिडीओ खरा असल्याची शिक्का मोर्तब करत अनेकांनी वृत्ताचे दाखले देत हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला.

हेही वाचा..कोरोना रोखण्यासाठी बारामतीकरांनी लढवली नवी शक्कल, वाचा काय आहे 'बारामती पॅटर्न'

पण जेव्हा लोकांनी जेवणाकरता एवढी गर्दी करत लांबच लांब रांगा लावल्या, या व्हिडिओचे सत्य धारावीकरांकडूनच जाणून घेतल्यानंतर व्हिडिओमागील सत्य बाहेर आलं.

ते म्हणजे, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ धारावीचा आहे. तो ही 90 फूट रोडवरचाच आहे. मात्र हा व्हिडिओ तब्बल साडेतीन वर्षे जुना आहे. साडेतीन वर्षांपूर्वी देशात नोटबंदी झाली होती. त्यावेळेस संपूर्ण जगात बॅंकांबाहेर रांग लागली होती. त्याच पद्धतीने धारावीत देखील लोकांनी बॅंकाबाहेर मोठी रांग लावली होती. त्या वेळेसचा हा व्हिडिओ आहे. धारावीत काही निवडक बॅंका आहेत. दरम्यान, बॅंकाबाहेर मोठी रांग लागली होती. त्यामुळे हा व्हायरल झालेला व्हिडिओ लॉकडाऊनच्या काळातील नाही, हे स्पष्ट झालं आहे.

हाच तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला Video..

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 12, 2020, 12:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading