रवी शिंदे, प्रतिनिधीभिवंडी, 04 जानेवारी : मुंबई- नाशिक महामार्गावर पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीस धक्का लागल्याच्या रागातून दुचाकीवरील त्रिकुटाने ट्रेलरमधील टायर निर्मितीसाठी वापरण्यात येणारी केमिकल पावडरच्या गोणी फाडून फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तब्बल दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
जौनपूर ,उत्तरप्रदेश येथील ट्रक ड्रायव्हर अमर प्रेमचंद राकेश हे ट्रेलरमध्ये उरण, न्हावाशेवा येथून टायर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी पुठ्ठी पावडर गोणींमध्ये भरून ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे घेऊन जात होते.
त्यावेळी मुंबई - नाशिक महामार्गावरील भोइरपाडा हद्दीत शेवय्या ढाबा या ठिकाणी ट्रेलरचा एका ऍक्टिव्हा दुचाकीस धक्का लागला. त्याचा राग मनात ठेवून ऍक्टिव्हावरील तिघा अज्ञात त्रिकुटाने ट्रेलरला अडवून त्याच्या चालक कॅबिनच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर कशाच्या तरी सहाय्याने ट्रेलरमधील पावडरच्या गोणी फाडून नुकसान केलं.
यामुळे तब्बल दीड ते दोन लाख रुपये किंमतीची पावडर रस्त्यावरअस्ताव्यस्त सांडल्याने ट्रेलर चालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी ट्रेलर चालकाने पडघा पोलिसांकडे ऍक्टिव्हावरील तिघा अज्ञातांविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी भादंवि कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवलीत 66 वर्षीय वृद्ध महिलेची आत्महत्या, इमारतीच्या 7व्या मजल्यावरून मारली उडी
मुंबई - नाशिक महामार्गावरील भोइरपाडा हद्दीत शेवय्या ढाबा या ठिकाणी ट्रेलरचा एका ऍक्टिव्हा दुचाकीस धक्का लागला.
दरम्यान, ठाणे (Thane) जिल्ह्याच्या डोंबिवलीमध्ये एका 66 वर्षीय महिलेने इमारतीच्या 7व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एसपी आहेर यांनी सांगितले की, ठाकूरली येथील ओम मंगल कैलास इमारतीच्या तिसर्या मजल्यावर राहणाऱ्या रुक्मिणी पिल्लई यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी रात्री साडेसहाच्या सुमारास त्या गच्चीवर गेल्या आणि तेथून उडी मारून आत्महत्या केली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात पिल्लई हे गेल्या 10 वर्षांपासून आजारी होत्या आणि त्या नैराश्यात होत्या. त्यातूनच रुक्मिणी यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, रुक्मिणी यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
डोंबिवली पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रुक्मिणी यांच्या हत्येमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस कुटुंबियांची आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.