S M L
  • VIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं !

    Published On: Aug 20, 2018 05:45 PM IST | Updated On: Aug 20, 2018 05:47 PM IST

    कल्याण, 20 ऑगस्ट : कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका घरावर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीला नागरिकांनी बाहेर काढलं. कल्याणच्या उंबर्डे गावात आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे उंबर्ड्याच्या भीमनगर परिसरात असलेलं एक झाड उन्मळून शेजारी राहणाऱ्या भरत जाधव यांच्या घरावर कोसळलं. यामुळे घराची भिंत कोसळून त्याखाली घरी असलेला रोहन जाधव अडकला. यावेळी परिसरातल्या लोकांनी धाव घेत रोहनला ढिगाऱ्याखालून काढलं आणि त्याचा जीव वाचवला. ही सगळी घटना स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केलीये. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत ढिगारा उपसून बाजूला केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close