मुंबई 17 ऑगस्ट: राज्यात सोमवारी 8,493 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6,04,358 झालीय. तर गेल्या 24 तासांमध्ये 11,391 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही 4,28,514वर पोहोचली आहे. सोमवारी 288 रुग्णांचा मृत्यू झाला असून अत्तापर्यत मृत्यू झालेल्यांची संख्या 20,265 एवढी झाली आहे. तर Active रुग्णांची संख्या ही 1,55,268 एवढी झाली आहे.
महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना (coronavirus) रुग्ण आढळले आहेत, अशा जिल्ह्यांच्या यादीत पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पुणे शहरात नेमक्या किती लोकांना कोरोनाची लागण झाली आणि पुण्यात कोरोनाचा कम्युनिटी प्रसार तर झालेला नाही हे तपासण्यासाठी पुण्यात सिरो सर्व्हे (sero survey) करण्यात आला आणि याचा अहवाल जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील सिरो सर्व्हे अहवालानुसार 36.1% ते 65.4% इतक्या लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज सापडल्या आहेत. याचा अर्थ या लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. पुण्यातील 5 प्रभागांमध्ये 20 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आलं.
‘कोरोना’मुळे वडिलांचा मृत्यू, अंत्यसंस्कारास मुलाचा नकार; डोळ्याला लागतील धारा
1 जुलैपर्यंत पुणे महापालिकेच्या प्रशासकीय क्षेत्रात कोरोनाची पुष्टी झालेल्या पाच प्रभागांचा अभ्यास केला. एकूण 1,664 व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. या रक्तातील अँटिबॉडी तपासण्यात आल्या. त्यावेळी या प्रभागांमध्ये कोविड-19 संक्रमणाचा व्यापक प्रसार झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रापेक्षा कमी असलेल्या या राज्याने 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला
दरम्यान, ज्या रुग्णांच्या शरीरात कोरोनाविरुद्ध अॅंटीबॉडीज तयार झाली आहेत, त्यांना दुसर्यांदा संसर्ग होण्याचा धोका नाही आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, अमेरिकेच्या सिएटल येथून मासेमारी करणारे जहाज निघाले होते, त्यात असेच 3 लोक सापडले. हे रिपोर्ट त्या मासेमारी करणाऱ्या लोकांचे आहेत, मासेमारीचे जहाज सिएटल येथून सुटण्यापूर्वी आणि नंतर घेतलेल्या अँटीबॉडीजसह आरटी-पीसीआर चाचण्यांवर आधारित आहेत. 18 दिवसांत या जहाजावरील 122 सदस्यांपैकी 104 जणांना एकाच स्त्रोतामुळे कोरोनाची लागण झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus