Home /News /mumbai /

ठाकरे सरकारचा आणखी एक षटकार! आता औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणार, उद्या मांडणार प्रस्ताव

ठाकरे सरकारचा आणखी एक षटकार! आता औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणार, उद्या मांडणार प्रस्ताव

औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजी नगर ठेवण्याचा प्रस्ताव उद्या राज्य मंत्री मंडळात मांडणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

    मुंबई, 28 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. परिणामी आता सत्तांतर होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे राहिलेल्या वेळेत ठाकरे सरकार लोकप्रिय निर्णय घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (New Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं समजलं आहे. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला विषय मार्गी लावण्याबाबत आता सेनेनी हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर ठेवण्याचा प्रस्ताव उद्या राज्य मंत्री मंडळात मांडणार असल्याची माहिती परीवहन मंत्री अनिल परीब यांनी दिली आहे. संभाजीनगर नावाचा इतिहास? 1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर नारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असा शहराचा उल्लेल केला जातो. 9 नोव्हेबर 1995 या वर्षात राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे  नामकरण करण्यासाठी असा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेने पाठवला. मात्र 2001 ला काँग्रेस आघाडी सरकाने रद्द ठरवला. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत असताना संभाजीनगरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावर आता निर्णय होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी ठाकरे सुपूत्रावर साधला थेट निशाणा, संतप्त शब्दात मांडली खंत राज्य सरकारचं काऊंट'डाऊन' शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला होता. यावेळीच ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं होतं. यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार गोत्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आव्हानापासून ते आवाहनापर्यंतची भाषा वापरून शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. याचदरम्यान, सरकारने आता लोकप्रिय निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचं आतापर्यंतच्या निर्णयावरुन दिसत आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Uddhav thackarey

    पुढील बातम्या