मुंबईकर 'ताप'ले ! मुंबईत तापमानाचा पारा वाढला

चालू हंगामातील आतापर्यंतचे मुंबईचे हे सर्वाधिक कमाल तापमान आहे. वाढत्या कमाल तापमानाने मुंबईकरांची काहिली झाली असतानाच रविवारच्या तापदायक वातावरणाने यात आणखी भर घातली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 26, 2018 09:00 AM IST

मुंबईकर 'ताप'ले ! मुंबईत तापमानाचा पारा वाढला

26 मार्च : उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळून निघत असतानाच आजही राज्याला चटके बसण्याचा अंदाज आहे. आज सर्वाधिक तापमान सोलापूरात नोंदलं जाईल असं अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्याच आला आहे. सोलापूरात पारा 41वर जाण्याची शक्यता आहे तर मुंबईतही 39 अंश सेल्सियस तापमानाची नोंद होणार आहे. रविवारी मुंबईत पारा 41पर्यंत गेला होता. त्यामुळे मुंबईकर आता उन्हाच्या तडाक्याने हैराण झासे आहेत.

चालू हंगामातील आतापर्यंतचे मुंबईचे हे सर्वाधिक कमाल तापमान आहे. वाढत्या कमाल तापमानाने मुंबईकरांची काहिली झाली असतानाच रविवारच्या तापदायक वातावरणाने यात आणखी भर घातली आहे. रविवारच्या उष्णतेच्या झळांनी मुंबईकरांना अक्षरश: होरपळून काढले आहे.

राज्याला उन्हाचे चटके, आजचं अपेक्षित कमाल तापमान

- मुंबई - 39 अंश सेल्सिअस

- महाबळेश्वर - 34 अंश सेल्सिअस

- पुणे - 40 अंश सेल्सिअस

- नागपूर - 39 अंश सेल्सिअस

- नाशिक - 38 अंश सेल्सिअस

- औरंगाबाद - 39 अंश सेल्सिअस

- सोलापूर - 41 अंश सेल्सिअस

- कोल्हापूर - 40 अंश सेल्सिअस

- रत्नागिरी - 36 अंश सेल्सिअस

दरम्यान नाशिकमध्येही हवामानात कमालीचा बदल दिसून येतोय. हवामानबदलामुळे उन्हाची तीव्रताही चांगलीच वाढलीय. रविवारी यंदाच्या हंगामातील उच्चांकी 37.3 इतकी नोंद करण्यात आली. मार्चअखेर उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका जाणवत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2018 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close