कौतुकास्पद: तेजस ठाकरेंसह टीमने लावला पालींच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध

कौतुकास्पद: तेजस ठाकरेंसह टीमने लावला पालींच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध

उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्यासह अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्यासह अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. कर्नाटकातील सकलेशपुरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मीळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे.

भारतात वेगवेगळ्या 50 पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीर रचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधून घेत आहेत. तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी 2014 सालीच शोधून काढल्या होत्या. मात्र गेली पाच वर्षे या दुर्मीळ प्रजातींच्या पालींवर जणुकीय तसेच इतर पालींपेक्षा या वेगळ्या का आहेत यावर प्राणी शरीर शास्त्रांच्या नियमानुसार अनेक सविस्तर संशोधन करण्यात आलं.

हेही वाचा - अंतिम वर्ष परीक्षांबाबत ठाकरे सरकारमधील मंत्र्याची मोठी घोषणा

या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नामकरण "मँग्निफिसंट डवार्फ गेको" असं करण्यात आलं. या चारही तरुणांच्या संशोधक टीमने या नव्या प्रजातींच्या पालीवर केलेला शोधनिबंध आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या "झुटाक्सा" या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे.

दरम्यान, तेजस ठाकरे यांनी याआधी सापाच्याही दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता. तेजस यांनी वडील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच फोटोग्राफीचाही छंद आहे. तसंच निसर्ग हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून मागील वर्षी आरेमधील वृक्षतोडीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 19, 2020, 11:10 AM IST

ताज्या बातम्या