भरधाव लोकलच्या दारात तरुणाची स्टंटबाजी

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ बघून कुणाही आईबापाच्या काळजाचा ठोका चुकेल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 9, 2017 05:11 PM IST

भरधाव लोकलच्या दारात तरुणाची स्टंटबाजी

09 डिसेंबर : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दारात लोंबकाळू नका अशी वारंवार सुचना दिली जाते. पण, काही महाभाग या सुचनेकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालतात. असा एक व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आलाय.

मुंबईच्या लोकल ट्रेनमधला एक भीतीदायक व्हिडिओ आमच्या हाती लागलाय. या व्हिओमध्ये एक तरूण मुलगा बेदरकारपणे वेगवान लोकलच्या दारात उभा राहिलेला दिसतोय. हा तरुण दारात उभा राहुन मोबाईलवर बोलतोय आणि लोकलच्या बाजूने दुसरी लोकल भरधाव वेगाने जातेय. पण तरीही तरूण बिनधास्तपणे उभा आहे.

अशा बेदरकारपणामुळे त्याचा जीव धोक्यात आला आहे. असला जिवाचा खेळ बरा नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ बघून कुणाही आईबापाच्या काळजाचा ठोका चुकेल. तुमचा मुलगा रेल्वेत असले चाळे तर करत नाही ना याची तुम्हाला खबरदारी घ्यायला हवीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...