BIG NEWS: रेल्वे प्रवास सर्वांसाठी खुला करा, राज्य सरकारची विनंती; असं असेल वेळापत्रक

BIG NEWS:  रेल्वे प्रवास सर्वांसाठी खुला करा, राज्य सरकारची विनंती; असं असेल वेळापत्रक

दिवाळीच्या आधी ही परवानगी मिळू शकते. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र लोकलमध्ये गर्दी झाली तर कोरोना प्रसाराची भीतीही सरकारला आहे.

  • Share this:

मुंबई 28 ऑक्टोबर: महिला आणि वकीलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर आता सर्वच प्रवाशांना काही काळ रेल्वे प्रवासाची (Mumbai Local) मुभा मिळावी अशी विनंती राज्य सरकारने रेल्वेला विभागाला केली आहे. पहाटे पहिल्या लोकल पासून सकाळी 7.30 पर्यंत सर्वांना लोकल प्रवास करण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत या वेळेतही सर्वांना प्रवास मुभा द्यावी ही मागणी राज्य सरकारची रेल्वे प्रशासनास केली आहे. मुंबईत प्रवाशांचे हाल होत असल्याने राज्य सरकारने ही विनंती केली आहे.

सर्वसामान्य व्यक्तीस सकाळी 11 ते दुपारी 4:30 पर्यंत आणि रात्री 8 ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत पास किंवा तिकिटावर प्रवास  करता येणार आहे. लेडीज स्पेशल ट्रेन दर तासाला एक असेल.

या विनंती नंतर आता रेल्वे मंत्रालय कुठला निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ही विनंती मान्य झाली तर प्रवाशांना मोठा दिलासा ठरणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लोकल गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. 7 महिन्यानंतर अखेर आता लोकल महिला, वकील आणि सुरक्षा रक्षक तसेच कामगारांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच आता लवकरच सर्व प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत. मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका प्रवाशाच्या प्रश्वाला ट्विटरवर उत्तर देत लवकरच लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असे संकेत दिले होते.

रामदास आठवलेंना गृहमंत्र्यांच्या ‘आठवले स्टाइल’ सदिच्छा

लोकल बंद असल्यामुळे कामासाठी मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना बस किंवा रस्ते मार्गानं जावे लागते. परिणामी ट्रॅफिकमध्ये त्यांचा अर्धा वेळ जातो, यामुळे एका संतप्त प्रवाशानं ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात या प्रवाशानं महिलांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली तशी सर्वसामान्यांना आणि व्यावसायिक, कर्मचारी यांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे, असे ट्वीट केले होते.

याआधी झाली होती बैठक

राज्य सरकार आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत खासगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार आणि सर्वच प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत चर्चा झाली होती. महिलांना ज्याप्रकारे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली त्याच धर्तीवर अन्य प्रवाशांना परवानगी देता येईल का?, त्यात वेळेचे बंधन घालावे का? याविषयी बैठकीत चर्चा झाली.

अखेर लशीची प्रतीक्षा संपली! पूनावालांनी सांगितलं कधी येणार कोरोनाची लस

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. त्याअनुषंगाने लोकलसेवेवर किती ताण येऊ शकतो, याचाही विचार केला गेला. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यात येऊ शकते.

Published by: Meenal Gangurde
First published: October 28, 2020, 6:03 PM IST

ताज्या बातम्या