मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

पुन्हा एकदा आपली वाटचाल लॉकडाऊनच्या (Lockdown) दिशेने सुरू झाली आहे का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुन्हा एकदा आपली वाटचाल लॉकडाऊनच्या (Lockdown) दिशेने सुरू झाली आहे का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुन्हा एकदा आपली वाटचाल लॉकडाऊनच्या (Lockdown) दिशेने सुरू झाली आहे का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई, 19 मार्च : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगाने कोरोना संसर्ग (Coronavirus) पसरू लागल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसंच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती (50 percent staff attendance in the office) ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपली वाटचाल लॉकडाऊनच्या (Lockdown) दिशेने सुरू झाली आहे का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असंही शासनाने आपल्या नव्या आदेशात म्हटलं आहे.

हेही वाचा - शरद पवारांचं पुन्हा धक्कातंत्र, गृहमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

सरकारच्या आदेशात आणखी कशाचा उल्लेख?

नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसंच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

नाट्यगृहांना नवे नियम कोणते?

1. मास्क परिधान केल्याशिवाय प्रवेश करण्यास परवानगी नाही.

2. ताप असलेल्या कुणालाही प्रवेश मिळणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी वापरण्यासाठी तापमान मोजण्यासाठी साधने

3. वेगवेगळ्या सोयीस्कर ठिकाणी पुरेशा हात सॅनिटायझर्स ठेवल्या पाहिजेत.

4. अंमलबजावणीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी संबंधित आस्थापने

दरम्यान, नव्या आदेशाचं पालन न केल्याचं कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Lockdown, Maharashtra, Mumbai