मुंबईत वाहतूकीचा वेग 20 टक्क्यांनी मंदावला; 'ही' आहेत कारणं

मुंबईत वाहतूकीचा वेग 20 टक्क्यांनी मंदावला; 'ही' आहेत कारणं

बेशिस्त वाहन चालक, गाड्यांची वाढलेली संख्या, या सगळ्यामुळे वाहनांचा वेग मंदावलाय.पण यामुळे कोंडी मात्र वाढली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर: मुंबईत वाहतुकीचा वेग २० टक्क्यांनी कमी झाल्याची बाब समोर आली आहे. मुंबई मेट्रोची चाललेली कामं. बेशिस्त वाहन चालक, गाड्यांची वाढलेली संख्या, या सगळ्यामुळे वाहनांचा वेग मंदावलाय.पण यामुळे कोंडी मात्र वाढली आहे.

मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होताना दिसते. सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोड, जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड, बीकेसी - एसव्ही रोड, एलबीएस रोड, या सगळ्या रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी तासंतास कोंडी होताना दिसते आहे.मुंबईत एकूण 10.27 लाख चारचाकी वाहनं आहेत. 17.2 लाख दुचाकी वाहनं आहे.राज्यातील 10 टक्के वाहनं मुंबईत आहेत पण रस्त्यांची लांबीही बाकी राज्यातल्या मुख्य रस्त्यांइतकीच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते. तसंच इतर विकास कामांमुळे वाहतूकीचा वेग मंदावला आहे. मुख्य म्हणजे दरवर्षी मुंबईत 8-10 टक्क्यांनी वाहनसंख्या वाढत असते.याशिवाय वेग कमी होण्याची आणि कोंडीची अजून काही कारणं पाहू या

मुंबईत वाहतूक कोंडीची प्रमुख कारणं

-जवळपास सर्व चालकांमध्ये शिस्तीचा अभाव

-शक्य तितके नियम मोडायचे हे धोरण

-लेनची शिस्त न पाळणे

-गाडी चालवताना 'मीच आधी जाणार' हे एकमेव धोरण

- 'रस्ता हा सर्वांचा आहे' ह्यावर काडीमात्र विश्वास नसणे

- मनाला येईल तिथे गाडी पार्क करणे

- रस्त्याच्या मधोमध गाडीतून उतरणे

- काही ठिकाणी परवानगी नसतानाही यू-टर्न घेणे

- फ्लायओव्हरवर वारंवार गाड्या बंद पडणे

- वाहतूक पोलिसांचा आळशीपणा

- वाहतूक पोलीस बहुतांश वेळा सिग्नललाच दिसतात

- रस्त्यावर फिरून गाड्या हटवणंही वाहतूक पोलिसांचं काम

- सिग्नल न पाळण्यात धन्यता मानणे

- फुटपाथवर फेरीवाले असल्यानं पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावं लागणे

- अनेक चालकांना मुलभूत नियमही माहीत नसणे

- गाडी येत नसली तरी लाच देऊन वाहन परवाना मिळतो हे कटू सत्य

- नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा अभाव

- सतत वाढणारी वाहनांची संख्या

- टूरिस्ट परमिटधारक चारचाकींच्या संख्येत लक्षणीय वाढ​

First published: September 20, 2017, 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading