आज आणि उद्या गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात बोटींना बंदी!

आज आणि उद्या गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात बोटींना बंदी!

'गेट वे ऑफ इंडिया' समोरील समुद्रात आज आणि उद्या नौदलाच्या मशिन गनच्या सराव चाचण्या होणार आहेत.

  • Share this:

30 जानेवारी : 'गेट वे ऑफ इंडिया' समोरील समुद्रात आज आणि उद्या नौदलाच्या मशिन गनच्या सराव चाचण्या होणार आहेत. त्यासाठी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत २२ किलोमीटरच्या परीसरात सर्व बोटींना बंदी घालण्यात आली आहे.

या परीसरात व्यापारी जहाजांबरोबरच एलिफंटा, अलिबाग, उरण, मांडवा तसेच फेरी बोटींना वाहतूक बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात पर्यटकांची वरदळ कमी असणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया समोरील ऑयस्टर बेटावरून कुलाबा द्विपगृहापर्यंतच्या १२ किलोमीटर परीसरात नौदलाच्या मशीन गन गोळीबार करणार आहेत. मुंबईच्या सुरक्षेसाठी ऑयस्टर बेटावर तैनात असलेल्या तोफा आणि मशीन गन यांच्या दर तीन महिन्यांनी नियमीत चाचण्या घेतल्या जातात.

त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गेट वे ऑफ इंडिया ते कुलाबा द्विपगृहापर्यंतच्या २२ किलोमीटर परीसरात सर्वच बोटींना वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे.

First published: January 30, 2018, 8:58 AM IST

ताज्या बातम्या