S M L

ठाण्यात घोडबंदर रोडवर कंटेनर उलटल्यामुळे वाहतूक कोंडी

नवी मुंबई, ठाण्याकडून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्यात. पुढचे साधारण पाच तास तरी इथली वाहतूक बंद राहणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jul 3, 2017 09:01 PM IST

ठाण्यात घोडबंदर रोडवर कंटेनर उलटल्यामुळे वाहतूक कोंडी

03 जुलै : ठाण्यातील घोडबंदर रोडवर गॅस कंटेनर उलटल्यामुळे ट्रॅफिक जाम झालंय. गॅस कंटेनर उलटल्यामुळे गॅस लिकेज होत असल्यानं खबरदारी म्हणून इथली दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आलीये.

नवी मुंबई, ठाण्याकडून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्यात. पुढचे साधारण पाच तास तरी इथली वाहतूक बंद राहणार आहे. वाहन चालकांना चिंचोटी मार्गाचा वापर करावा असं आवाहन ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलंय. तर ठाण्यावरून वसईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या भिवंडीच्या मार्गाने नेण्याचंही आवाहन करण्यात आलंय. पण त्यामुळे संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेस घोडबंदर रोडवर भरपूर ट्रॅफिक जाम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 07:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close