पाऊस कधी थांबणार? मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबद्दल IMD ने दिली माहिती
पाऊस कधी थांबणार? मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबद्दल IMD ने दिली माहिती
पहिल्या आठवड्यात देशाच्या पश्चिम, वायव्य आणि या भागांच्या आजूबाजूच्या मध्य भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये सर्वसाधारण प्रमाणाहून अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई, 30 सप्टेंबर : यंदा नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाच्या हंगामात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं आहे. 1 जूनला या पावसाला (monsoon rain) सुरूवात होऊन जून ते सप्टेंबर कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. आता परतीच्या मान्सूनविषयी हवामान विभाग दिल्लीचे तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मान्सूनचा (monsoon) परतीचा प्रवास वायव्य भारतातील काही भागांतून येत्या ६ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. यामुळं होणाऱ्या परतीच्या पावसाविषयी चार आठवड्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.
पहिल्या आठवड्यात देशाच्या पश्चिम, वायव्य आणि या भागांच्या आजूबाजूच्या मध्य भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये सर्वसाधारण प्रमाणाहून अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हे वाचा - SHOCKING: पत्नीला द्यायचा ड्रग्ज, अनोळखी लोक करायचे बलात्कार; तब्बल 10 वर्षांनी गुन्हा उघडकीस
दुसऱ्या आठवड्यात देशाच्या मध्य भागातील राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण सर्वसाधारण प्रमाणाहून जास्त राहील. तर, वायव्य भागात हे प्रमाण सर्वसाधारण असेल. यानंतर देशातील वायव्य प्रदेशातील पावसाचं प्रमाण कमी होत जाईल.
Rainfall
Wk1 :Mostly above normal rain with an increase of RF ovr western,NW & adjoining central parts of India
Wk2 :Above normal RF ovr central India.NW India normal RF.Monsoon withdrawal frm NW India likely
Wk3 :RF ovr E parts of India likely to cont
Wk4 :Mostly below normal pic.twitter.com/koLdpmFtzJ
तिसऱ्या आठवड्यात देशाच्या पूर्व भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. चौथ्या आठवड्यात देशातील बहुतेक ठिकाणचा पाऊस सर्वसाधारण प्रमाणाहून कमी झालेला असेल.
हे वाचा - VIDEO : खड्डे वाचवण्याच्या नादात 3 गाड्यांचा विचित्र अपघात; कार थेट भातसा नदीत
यंदाचा नैऋत्य मान्सून हंगाम 1 जूनला सुरू झाला होता. तो ३० सप्टेंबरला संपत आहे. या हंगामात देशाच्या वायव्य भागात 96 टक्के, मध्य भागात 104 टक्के, पूर्व आणि ईशान्य भागांत 88 टक्के आणि दक्षिणेत 111 टक्के असं विभागनिहाय पावसाचं प्रमाण राहिलं आहे. यापैकी जून महिन्यात 110 टक्के पाऊस झाला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पावसाचं प्रमाण अनुक्रमे 93 आणि 76 टक्के राहिलं. तर, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 135 टक्के पाऊस पडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.