मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकरच लागतील-विनोद तावडे

मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकरच लागतील-विनोद तावडे

मुंबई विद्यापीठाचे निकाल आता लवकरच लागतील. पण त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होणार नाही अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

  • Share this:

18 आॅगस्ट : मुंबई विद्यापीठाचे निकाल आता लवकरच लागतील. पण त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होणार नाही अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी निकाल उशिरा सबमिट केले तरी चालेल अशी हमीही त्यांनी तावडेंना दिली.

मुंबई विद्यापीठाच्या निकालातील घोळासंदर्भात राज्यपाल विद्यासागर राव यांच्याबरोबर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बैठक पार पडली. विद्यापीठांच्या रखडलेल्या निकालांचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांनी ही बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर विनोद तावडे यांनी मीडियाशी संवाद साधला.

आज राज्यपालांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, प्रभारी कुलगुरू, प्रधान सचिव यांची बैठक घेतली. त्यासंदर्भात एक प्रेझेंटेशन झालं. कॅटच्या परीक्षेमार्फत जे प्रवेश दिले जातात ते कॅट मेरीटमार्फत दिले जातील आणि निकाल उशिरा सबमिट केला तरी चालेल अशी हमी तावडे यांनी दिली.

ज्या उत्तरपत्रिका तपासून झालेल्या आहेत त्यांचे अर्धे निकाल जाहीर करण्यात येतील का हे बोर्ड ऑफ एक्झाम ला विचार करून सांगावं याची सूचना केली आहे. पुर्नमुल्यांकनाची प्रक्रीया लवकर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती तावडे यांनी दिली.

विशेष म्हणजे, 31 जुलै, 5 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या तिन्ही तारखेला पुर्ण निकाल लावण्यात विद्यपीठ प्रशासनाला अपयश आलं. तर या सगळ्या गोंधळात कुलगुरू संजय देशमुख रजेवर गेलेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप आहे.

First published: August 18, 2017, 6:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading