कल्याण: रुग्णाच्या नातेवाईकांनी केली कोविड रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांनाही शिविगाळ

कल्याण: रुग्णाच्या नातेवाईकांनी केली कोविड रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांनाही शिविगाळ

आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त करीत तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • Share this:

कल्याण 21 सप्टेंबर: कल्याण-डोंबिवलीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतेय. डॉक्टर आणि नर्स आरोग्य यंत्रणा आपल्या परीने काम करीत आहे. तरी देखील काही लोक हे विनाकारण त्यांचा राग आरोग्य व्यवस्थेवर काढत आहेत. असाच एक प्रकार कल्याणच्या खडकपाडा येथील आयुष्य खाजगी कोविड रुग्णालयात घडला आहे.

रविवारी दुपारी रुग्णालयासमोरून जाताना एक व्यक्ती चक्कर येऊन खाली पडला. आयुष्य रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने त्या व्यक्तिला उचलून व्हील चेअरवर बसविले. त्या व्यक्तीला पुढील  अन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करा. कारण हे रुग्णालय कोविड रुग्णालय असे सुरक्षा रक्षकाने सांगितले. पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तिचा मृत्यू झाला.

यानंतर राधानगरी सोसायटीतील आठ ते दहा जण रुग्णालयात आले. रुग्णाला का दाखल करुन घेतले नाही असा सवाल उपस्थित करीत रुग्णालयात येणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरच्या गाडी चालकास मारहाण केली. डॉक्टर आणि नर्सला शिवीगाळ केली. रुग्णालयात तोडफोड केली.

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोविड रुग्णालयात अन्य आजारांचे रुग्ण दाखल करुन घेतले जात नाहीत. हे माहित असताना स्थानिक नागरीकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. रुग्णालयात गोंधळ घातला. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या गाडी चालकास मारहाण केली यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त करीत तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 21, 2020, 10:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading