दिलासादायक! ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पोहोचलं 50 टक्क्यांच्या वर

दिलासादायक! ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पोहोचलं 50 टक्क्यांच्या वर

गेल्या 24 तासांमध्ये 2933 एवढ्या नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या तब्बल 77,793 एवढी झाली आहे.

  • Share this:

ठाणे 4 जून: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. यात मुंबई आणि ठाणे परिसरातल्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. मात्र यात दिलासा देणारी गोष्ट ठाणे विभागात आढळून आली आहे. ठाणे विभागात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे जास्त असून अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत  4 हजार 404 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 4 हजार 771 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण एकुण रुग्णसंख्येच्या  50.31 टक्के आहे. आजअखेर पर्यत जिल्ह्यात 9हजार 484रुग्णांची नोंद झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्व मनपा व नपा तसेच ग्रामीण भागात आत्तापर्यंत पर्यत सुमारे 51 हजार 43 संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 39 हजार 350 संशयितांना  चाचणी नंतर  कोरोनाची बाधा झाले नसल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 309 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाला उंचीची भीती? समुद्रसपाटीपेक्षा डोंगराळ भागात व्हायरसचा प्रभाव कमी

राज्यात कोरना रुग्णाच्या संख्येत होत असलेली वाढ आजही कायम आहे. गेल्या 24  तासांमध्ये 2933 एवढ्या नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या तब्बल 77,793 एवढी झाली आहे. तर राज्यात आज 123 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2710 एवढी झाली आहे.

सगळे प्रयत्न करूनही आकडा कमी होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 68 जण हे मुंबई आणि ठाण्यातले आहेत.

Unlock 1.0 : तब्बल अडीच महिन्यांनंतर पुणेकरांसाठी खुली झाली ही ठिकाणं, पण..

आज 1 352 एवढे रुग्ण बरे झालेत. तर आत्तापर्यंत राज्यात 33681 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 43.29 टक्के एवढं आहे. तर मृत्यूचं प्रमाण 3.48 टक्के एवढं आहे.

 

First published: June 4, 2020, 11:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading