Home /News /mumbai /

खरी शिवसेना आमचीच, आमच्याकडे बहुमत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार, म्हणाले..

खरी शिवसेना आमचीच, आमच्याकडे बहुमत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार, म्हणाले..

शिंदे गट आणि भाजपने आज बहुमत चाचणीत विजय मिळवला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपने संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

    मुंबई, 4 जुलै : राज्यात सुरू असलेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर अखेर शिंदे गट आणि भाजपचं (Shinde and BJP) सरकार स्थापन झालं आहे. रविवारी अध्यक्षपदाची निवडणूक तर आज बहुमत चाचणीत या युतीने विजय मिळवला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी आमचं सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरचं सरकार आहे. हे सरकार खरंतर अडीच वर्षांपूर्वी स्थापन व्हायला हवं होतं, अस मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. यादरम्यान, शिवसेना पक्ष कोणाचा? यावर शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काय म्हणाले मुख्यमंत्री? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या 50 लोकांच्या गटाला जो पाठींबा दिला त्याला दिलदारपणा लागतो. खरंतर हे सरकार अडीच वर्षांपूर्वीच यायला हवं होतं. पण, ठीक आहे. हे जनतेच्या मनातील सरकार आहे. आजच्या बहुमत चाचणीत आघाडीला 100 मतही मिळाली नाही. यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. मेट्रोची कामे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली आहेत. यापुढेही त्यांच्या मार्गदर्नशनात प्रलंबित कामे होतील. आमचं सरकार शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकारचा या सरकारला आशीर्वाद आहे. त्यामुळे आता कामे खूप वेगवान होणार आहेत. माझी दोन मुलं डोळ्यासमोर गेली, मुख्यमंत्री शिंदेंना सभागृहात अश्रू अनावर आम्हीच खरी शिवसेना कोणी कितीही दावा करत असलं तरी खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आमच्याकडे निम्म्यापेक्षा जास्त आमदार असून अजूनही लोक येत राहतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आमदारावंर कारवाईच्या बातातीत विचारले असता, आम्ही सर्वांवर कारवाई करणार नाही. पण, जे नियमानुसार असेल ते होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. हिंदुत्त्वाच्या मुद्यावर बोलू शकत नव्हतो : मुख्यमंत्री यापूर्वी सभागृहात बोलताना शिंदे म्हणाले, की सावरकरांबद्दल बोलू शकत नव्हतो. काँग्रेसने टीका केली, त्याला उत्तर देऊ शकत नव्हतो. हिंदुत्त्वाच्या मुद्यावर बोलू शकत नव्हतो. कालही आम्ही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचं आणि दिघेसाहेबांचे शिवसैनिक आहोत. कुणी व्यक्तिगत घेऊ नये, सुनील प्रभू यांच्या सभेत गर्व से कहो, हम हिंदू है, असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांचा बाळासाहेबांचा सहा वर्षांच्या मतदानाचा अधिकार कुणी काढला. त्यावेळी तक्रार ही काँग्रेसने केली होती.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या