Home /News /mumbai /

कुर्ल्यात अचानक सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळली, महिला गंभीर जखमी

कुर्ल्यात अचानक सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळली, महिला गंभीर जखमी

कुर्ला परिसरात नाद हॉटेलजवळ आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नाद हॉटेलजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाची भिंत अचानक कोसळली.

मुंबई, 23 नोव्हेंबर : मुंबईतील (Mumbai) कुर्ला (Kurla) परिसरात एका सार्वजनिक शौचालयाची (Public toilets) भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेला तातडीने राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कुर्ला परिसरात नाद हॉटेलजवळ आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नाद हॉटेलजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाची भिंत अचानक कोसळली. भिंतीच्या ढिगाराखाली एक महिला अडकली होती. स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगार बाजूला करून महिलेला बाहेर काढले. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. बेशुद्ध अवस्थेत या महिलेला तातडीने  राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. विजेचा धक्का लागून दोन भावांचा मृत्यू दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुसळी शिवारात ह्रदयद्रावक घटना घडली आहे. विजेचा धक्का लागून दोन भावांचा मृत्यू झाला आहे.  तब्बल 20 तासांच्या अथक परिश्रमानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. प्रदीप वैद्य आणि गणेश तार्डे अशी या मयत तरुणांची नावं आहेत. भाऊसाहेब वैद्य यांच्या शेतातील विहीर काठोकाठ भरली आहे. शेतात सध्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. त्यात विहिरीतील विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने हे दोघे विद्युत पंप विहिरीत सोडत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाला आणि दोघांना जबर विजेचा धक्का लागला, त्यानंतर दोघेही जण विहिरीत कोसळले, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.  अग्निशमन दल व बदनापूर पोलिसांच्या मदतीतून तब्बल 20 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. दोन दिवसांपूर्वी भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथे तिघा भावंडांचा वीजेचा धक्का  लागून विहिरीत पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजीच असताना पुन्हा कुसळी येथे दोघे आते-मामा भाऊ पाण्यात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या