भायखळा कारागृहात पोलीस आणि कैद्यांमध्ये हाणामारी

भायखळा कारागृहात पोलीस आणि कैद्यांमध्ये हाणामारी

आज सकाळी कारागृह पोलीस आणि कैदी यांच्यामध्ये जोरदार मारामारी झालीय. यात चार पोलीस जखमी झालेत.

  • Share this:

24 जून : मुंबईतील भायखळा कारागृहात आज (शनिवारी) सकाळी कारागृह पोलीस आणि कैदी यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झालीये. यात चार पोलीस जखमी झालेत. यात दोन महिला आणि दोन पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

काल मंजूळा शेट्टे वय ३१ या महिला कैदीला संध्याकाळी जे.जे. रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आलं होतं. मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू आहे. याच मुद्यावरुन आज सकाळी कैद्यांनी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. या कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या मारहाणात चार जण जखमी झालेत. रामहरी कुटे हवालदारच्या डोळ्याला मार लागलाय. चक तुरुंग अधिकारी जगदीश धुमणे कपाळाला मार लागलाय. महिलांना शिपाई आरती आवसरमल, उजव्या गालाला मार लागलाय. तर सुवर्णा मेमाणे यांच्या हाताला मार लागलाय. या सर्वांना जेजे रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2017 06:16 PM IST

ताज्या बातम्या