Home /News /mumbai /

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहुत लावणार हजेरी, तुकाराम महाराज शिळा मंदिराचे करणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहुत लावणार हजेरी, तुकाराम महाराज शिळा मंदिराचे करणार लोकार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत.

    मुंबई, 22 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 14 जून रोजी देहूत येणार असल्याचं समोर आलं आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांना घेऊन आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले होते. पंतप्रधानांनी आमंत्रण स्विकारले असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत. याबाबत आचार्य तुषार भोसले यांचे ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी १४ जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Narendra modi

    पुढील बातम्या