सामुहिक आत्महत्येची परवानगी द्या, राष्ट्रपती पदक मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मागणीने खळबळ

सामुहिक आत्महत्येची परवानगी द्या, राष्ट्रपती पदक मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मागणीने खळबळ

मुंबईत 2006च्या ट्रेन मधील साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी या अधिकाऱ्याने बचाव कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

  • Share this:

मुंबई 12 ऑगस्ट: सरकारी कारभाराला कंटाळलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानेच (Police Officer) सरकारकडे कुटुंबासह आत्महत्येची परवानगी मागितल्याने खळबळ उडाली आहे. आपली पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्येची परवानगी मगितलीय एका राष्ट्रपती पदक विजेत्या सब इंस्पेक्टरने. गेली 2 वर्षे फक्त बदली हवी म्हणून असंख्य अर्ज करणाऱ्या आणि प्रत्येक वेळी बदलीच्या ऑर्डर मध्ये डावलला गेलेला हा अधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभागात सब  इंस्पेक्टर आहे. त्यांच्या या मागणीने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मुंबईत 2006च्या ट्रेन मधील साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी या अधिकाऱ्याने बचाव कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. माहीममध्ये याच बॉम्बस्फोटात जखमी झालेलं नाव म्हणजे राकेश साळुंखे. राकेश साळुंखे यांनी जखमी अवस्थेतही ट्रॅक वर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांना जीवनदान दिलं.

दोन खांद्यावर 2-2 जखमींना घेऊन ट्रॅकवरून धावत धावत माहीम स्टेशन गाठलं. आणि असं एकदा नाही तर तीन वेळ करत त्यांनी प्रवाशांचे प्राण वाचवले. 5 जणांना जीवदान देणाऱ्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या या अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदक जीवन रक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आणि आज हेच राकेश साळुंखे आत्महत्या करण्याची परवानगी मागत  आहेत.

भाजप नगरसेवकांचा मुंबई पालिका आयुक्तांनी घेतला धसका? सुरक्षेसाठी बाउन्सर तैनात

राकेश साळुंखे ट्रॅकवरून धावत ज्या जखमींना वाचवत असताना राकेश साळुंखेच्या हे लक्षातही नाही आलं की त्यांच्या मणक्यांना या वजनामुळे मोठी हानी पोहोचेल. गेली 14 वर्षे राकेश आपल्या मणक्यांच्या उपचार घेत आहेत. 2016 मध्ये अमरावतीला आणि त्यानंतर  औरंगाबादला त्यांची  बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या उपचारातही खंड पडला.

त्यानंतर राकेश यांनी असंख्य अर्ज केले आणि आपल्या वरिष्ठांच्या असंख्य भेटीगाठी घेतल्यानंतरही राकेश यांना मुंबईत बदली देण्यात आली नाही. मुंबईत उपचारासाठी घ्यावी लागणारी बिनपगारी रजा, उपाचारावर होणारा खर्च, औरंगाबादेत आणि मुंबईत परिवारासाठीचा खर्च या सगळ्यांचा ताळमेळ बांधताना राकेश यांना नाकी नऊ आलेत.

नियमानुसार बदली होणं अपेक्षित असतानाही आपला विचार केला गेला नाही म्हणून राकेशनी थेट आपल्या वरिष्ठांच्याकडेच आत्महत्येची परवानगी मागितली. आणि असं का हा जाबही विचारला.

कुत्र्यानं उडी मारली आणि प्लायवूडचा ढिगारा कोसळला, सख्ख्या बहिणींचा मृत्यू

पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. राकेश यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यात या सगळ्या मानसिक त्रासाचा बळी ठरतंय त्याचं कुटुंब. त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाने या सगळ्याचा ताण असह्य होऊन दोनदा आपला जीव देण्याचाही प्रयत्न केला.

नियमात बसत असताना, मुंबईत बदलीसाठी 40 जागा असतानाही जर राकेशचा विचार का होत नाही असा प्रश्न आता विचारला जातोय. आता यात मुख्यमंत्रांनीच हस्तक्षेप नाही केला तर 15 ऑगस्टला कुटुंबाच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 12, 2020, 3:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading