Home /News /mumbai /

अखेर उद्या 12 वाजता गुवाहाटीतून विमानाचं टेकऑफ; बंडखोर आमदारांचा पुढील मुक्काम? 

अखेर उद्या 12 वाजता गुवाहाटीतून विमानाचं टेकऑफ; बंडखोर आमदारांचा पुढील मुक्काम? 

देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनंतर गुवाहाटीतही हालचाली सुरू झाली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंनीही आमदारांची बैठक घेतली.

    मुंबई, 28 जून : शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी गेल्या अनेक दिवसांपासून गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सध्याचं सरकार अल्पमतात असल्याने बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. त्याच्या या मागणीनंतर गुवाहाटीतही हालचाली सुरू झाली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंनीही आमदारांची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 30 जून रोजी राज्यपाल सरकारला बहुमत चाचणीसाठी बोलावू शकते. अद्याप याबाबत राज्यपालांकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. उद्या दुपारी 12 वाजता गुवाहाटीतील बंडखोर आमदार आपला मुक्काम हलवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते सर्वजण विशेष विमानाने निघणार आहे. त्यांनी मुंबईतच आणणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. केंद्रीय पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेत सर्व आमदार मुंबईत येणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. मविआ सरकारकडे काय आहे पर्याय? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची तारीख दिली तर सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार हे निश्चित आहे. हाच मुद्दा सोमवारी झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्येही उपस्थित करण्यात आला. विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या 16 आमदारांवर कारवाई करू नये, असा आदेश दिला. कोर्टाने हा आदेश दिल्यानंतर वकिलांनी मधल्या काळात बहुमताची चाचणी घ्यायला सांगितली तर काय करायचं? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना कोर्टाने ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यावर निर्णय कसा द्यायचा म्हणून उत्तर दिलं. तसंच बहुमत चाचणीची परिस्थिती उद्भवली तर पुन्हा कोर्टात या सांगितलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Assam, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या