मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अॅट्रॉसिटीबाबत रिपाइं पुनर्विचार याचिका दाखल करणार -आठवले

अॅट्रॉसिटीबाबत रिपाइं पुनर्विचार याचिका दाखल करणार -आठवले

 दलित अधिकाऱ्यांना प्रमोशन आणि चांगल्या ठिकाणी पोस्टींग मिळत नाही. गडचिरोलीसारख्या ठिकाणी अनेक पोलीस दलित आहेत

दलित अधिकाऱ्यांना प्रमोशन आणि चांगल्या ठिकाणी पोस्टींग मिळत नाही. गडचिरोलीसारख्या ठिकाणी अनेक पोलीस दलित आहेत

दलित अधिकाऱ्यांना प्रमोशन आणि चांगल्या ठिकाणी पोस्टींग मिळत नाही. गडचिरोलीसारख्या ठिकाणी अनेक पोलीस दलित आहेत

  24 मार्च : अॅट्रॉसिटीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भाजप सरकारला जबाबदार धरणं हे विरोधकांचं राजकारण आहे. सरकारने याबाबत रिट पिटीशन दाखल करावी अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीये. तसंच अॅट्रॉसिटीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध आरपीआयतर्फे पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची घोषणा आठवलेंनी केली.

  रामदास आठवलेंनी आज मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी  मिलिंद एकबोटे असतील किंवा संभाजी भिडे असतील ज्या लोकांनी भिमा कोरेगाव पेटवण्याचं काम केलं त्यांना अटक होणं गरजेचं आहे. कायद्यासमोर कोणीही मोठं नाही असं आठवले म्हणाले.

  तसंच 26 मार्चला प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चाचं आमंत्रण आम्हाला नाही. त्यामुळे आमचा पक्ष त्यांच्या मोर्चात सहभागी होणार नाही. भिमा कोरेगावच्या बंदवेळीही प्रकाश आंबेडकर आमच्याशी बोलले नव्हते पण तरीही आमचा पक्ष बंदमध्ये आघाडीवर होता. त्याचं श्रेय एकट्या आंबेडकरांनी घेऊ नये असा टोला आठवलेंनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

  अॅट्रॉसिटी अॅक्ट १९८९ वर संसदेत १८ तास चर्चा करून सर्वसंमतीने मंजूर केला होता. अॅट्रॉसिटीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध आरपीआयतर्फे पुर्नविचार याचिका दाखल करणार आहे अशी घोषणा आठवलेंनी केली.

  'दलित अधिकाऱ्यांना बढती मिळत नाही'

  अॅट्राॅसिटीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भाजप सरकारला जबाबदार धरणं हे विरोधकांचं राजकारण आहे अशी सरकारची बाजू घेत आठवलेंनी दलित अधिकाऱ्यांना प्रमोशन आणि चांगल्या ठिकाणी पोस्टींग मिळत नाही. गडचिरोलीसारख्या ठिकाणी अनेक पोलीस दलित आहेत असा दावाच केला.

  सरकारने रिट पिटीशन दाखल करावी

  तसंच सर्व केसेस बोगस असतात याच्याशी आम्ही सहमत नाही. सरकारने याविरोधात रिट पिटीशन दाखल करावी यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना भेटून सांगणार, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्यांचं आठवलेंनी सांगितलं.

  First published:
  top videos

   Tags: Ramdas Athawle