मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अमेरिकेतून मुंबईत आलेली व्यक्ती कोरोनाबाधित, राज्यातील संख्या 40 वर

अमेरिकेतून मुंबईत आलेली व्यक्ती कोरोनाबाधित, राज्यातील संख्या 40 वर

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आथा 40 एवढी झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आथा 40 एवढी झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आथा 40 एवढी झाली आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 17 मार्च : कोरोनाबाधित रुग्णांची राज्यात आज मोठी वाढ झाली नसली तरीही पुणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आथा 40 एवढी झाली आहे. मुंबई येथे आज आढळलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जाऊन आला होता. त्रास सुरू झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील 10 ठळक मुद्दे: 1. कमी उपस्थितीत कामकाज करण्याबाबत लवकरच निर्णय 2. गरज असेल तर प्रवास करा 3. सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचारी ठेवण्याचा विचार 4. कठोर पावलं उचलण्याची आमची इच्छा नाही. 5. मुंबईसह इतर दुकानदारांना आवाहन करण्यात आलं आहे की दुकानं बंद ठेवावी. 6. गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलत आहोत 7. सरकारी कर्मचाऱ्यांना आठवडाभर सुट्टी नाही. 8. पुढचे 15 दिवस खूप महत्वाचे 9. लोकांनी स्वत:हून काळजी घ्यावी 10. भविष्यात काही कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात दरम्यान, राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. राज्यात पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. तो मुंबईत दाखल होता. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. मात्र सध्या सरकारने हा निर्णय घेण्याचं टाळलं आहे.
First published:

Tags: Mumbai news

पुढील बातम्या