Home /News /mumbai /

राहुल गांधींवर आक्षेपार्ह जाहिरात, काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसे स्टाईल 'खळ्ळ-खट्याक' राडा, VIDEO

राहुल गांधींवर आक्षेपार्ह जाहिरात, काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसे स्टाईल 'खळ्ळ-खट्याक' राडा, VIDEO

युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी पूर्व येथील स्टोरीया फूड्सच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली

मुंबई, 27 एप्रिल : काँग्रेस (Congress) पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia gandhi) आणि राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्या कंपनीला काँग्रेसच्या (Congress workers) कार्यकर्त्यांनी खळ्ळ-खट्याक स्टाईलने धडा शिकवला आहे. कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून जोरदार तोडफोड केली आहे. स्टोरीया फूड्स या कंपनीने (Storia Foods Company advertisement) एक जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीमध्ये  काँग्रेसचे नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह चित्रिकरण करण्यात आले आहे. या जाहिरातीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या आदेशानुसार मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस आणि युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी पूर्व येथील स्टोरीया फूड्सच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली.कार्यालयातील फर्निचरची तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली. IPL 2021: 'हॉस्पिटल्स मिळत नसताना फ्रँचायझी इतका पैसा कसा खर्च करत आहेत?' 'आमचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल जाहिरातीत आक्षेपार्ह दाखविण्यात आले, ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांना आम्ही चांगलाच धडा शिकवलेला आहे. ही जाहिरात ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि स्टोरीया फुडस कंपनीने जाहीररीत्या माफी मागावी अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन मुंबई काँग्रेस करेल. स्टोरीया फुडसचे कार्यालय आम्ही बंद पाडू, असा इशारा भाई जगताप यांनी दिला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या