राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली, दिवसभरात 7 हजारांची भर

राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली, दिवसभरात 7 हजारांची भर

Maharashtra Covid Update: गेल्या 24 तासांमध्ये 7 हजार 347 नव्या रुग्णांच भर पडली. तर 184 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे.

  • Share this:

मुंबई 23 ऑक्टोबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या घसरणीचा वेग कायम आहे. सलग काही दिवसांपासून संख्या घटत असून त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र धोका संपलेला नाही इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर नवरात्रोत्सवही सुरू आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. दिवसभरात 13 हजार 247 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 14 लाख 45 हजार 103 एवढी झालीय. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.52 टक्क्यांवर गेला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 7 हजार 347 नव्या रुग्णांच भर पडली. तर 184 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे. राज्यात  सध्या एकूण 1 लाख 43 हजार 922 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत काय आहे स्थिती?

मुंबईत आज एकाच दिवसात आढळून आले 1470 रुग्ण. कोरोणाच्या एकूण रुग्णांची संख्या 248804 वर पोहचली आहे. तर कोरोणामुळे 48 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे  मुंबईतल्या मृतांची एकूण 9966 झाली आहे. दिवसभरात 1696 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 218254 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

कुणाला मिळणार मोफत कोरोना लस? राज्य नव्हे मोदी सरकारच ठरवणार

दरम्यान, मोदी सरकारने देशव्यापी कोव्हिड 19 लशीकरण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

देशभरातील कोरोना लशीचा पुरवठा केंद्र सरकारच्या हाती असेल. यासाठी विशेष लशीकरण कार्यक्रम राबवला जाईल, त्याअंतर्गत प्राधान्यक्रम ठरवून मोफत लस दिली जाईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार अशा 30 कोटी लोकांना मोफत लस देणार आहे. या लोकांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार त्यांचे चार गट करण्यात आले आहेत आणि या लोकांनाच कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे.

कोरोनावरील उपचारासाठी पहिल्या औषधाला मंजुरी; रुग्ण लवकर बरा होत असल्याचा दावा

30 कोटी लोकांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. सर्वात आधी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, नर्सेस आणि आशा वर्कर्स यांना लस दिली जाईल. अशा एक कोटी लोकांना ही लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात महापालिका कर्मचारी, पोलीस अशा 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल. त्यानंतर 50 वयापेक्षा जास्त वय असलेल्या सुमारे 26 कोटी सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल. तर एक कोटी लोक असे असतील ज्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे, मात्र त्यांना इतर गंभीर आजार आहेत आणि देखभालीची गरज आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 23, 2020, 9:04 PM IST

ताज्या बातम्या