COVID-19: राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णाची संख्या जास्त

COVID-19: राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णाची संख्या जास्त

सोमवारीही बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त होती. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 59.34 एवढं झालं आहे.

  • Share this:

मुंबई 28 जुलै: राज्यात आज 10 हजार 333 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णाची संख्या अधिक आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात जास्त संख्या असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. (Covid-19 Patient) आज राज्यात 7 हजार 700 नवे रुग्ण आढळून आलेत. नवीन रुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असली तरी मृत्यूचा आकडा मात्र कमी होत नाही.  आज राज्यात 282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारीही बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त होती. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 59.34 एवढं झालं आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 3,91,440 एवढी झाली आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये हर्ड इंम्युनिटीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल 57 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या आहेत. पालिका आणि इतर संस्थांच्या एकत्रित सेरॉलॉजीकल सर्वेत हे सिद्ध आल्याचा माहिती आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या दुसऱ्या सर्वेक्षणात हर्ड इम्म्युनिटी बाबत निष्कर्ष जाहीर करण्यात येणार आहे.

सरकारचं सर्व लक्ष आणि हॉटस्पॉट ठरलेल्या मोठ्या शहरांवर आहे. त्याच बरोबर शहरांमधून ग्रामीण भागाकडे ही साथ पसरू नये यावरही लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

COVID-19: पावसाळ्यात या 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर होऊ शकते बाधा

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला असला तरी मृत्यूचा आकडा कमी कसा करायचा याचं आव्हान सरकार समोर आहे.

भारतातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus Cases in India) संख्या आता 14 लाख 83 हजार 156 झाली आहे. गेल्या 24 तासांत 47 हजार 704 नवीन रुग्ण आढळून आले. तर, एकाच दिवसात 654 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 लाख 96 हजार 988 सक्रीय रुग्ण आहेत.

मेड इन इंडिया कोरोना लस घेतल्यानंतर कसं वाटतंय? तरुणाने मांडला आपला अनुभव

तर, आतापर्यंत 33 हजार 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणदे आतापर्यंत 9 लाख 52 हजार 743 लोकं निरोगी होऊन घरी परतले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 64.23% झाला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 28, 2020, 8:21 PM IST

ताज्या बातम्या