राज्यात COVIDमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या गेली 15 लाखांच्यावर, मुंबईसाठीही Good News

राज्यात COVIDमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या गेली 15 लाखांच्यावर, मुंबईसाठीही Good News

राज्याचा मृत्यू दर हा 2.62 एवढा आहे. मुंबईतही सलग महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे.

  • Share this:

मुंबई 30 ऑक्टोबर: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या ही 15 लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात राज्यात 8,241 जणांनी कोरोनावर मात केली तर 6,190 नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्याही 15,03,050 एवढी झालीय. तर रुग्णांची एकूण संख्या ही 16,72,858 एवढी झाली आहे. राज्यात आज 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा हा 43,837वर गेला आहे. राज्यात सध्या 1,25,418 जणांवर उपचार सुरू आहेत.

राज्याचा मृत्यू दर हा 2.62 एवढा आहे. मुंबईतही सलग महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. त्याचबरोबर चाचण्यांमध्येही वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अदार पूनावाला म्हणाले आहेत की ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका परीक्षेच्या निकालाच्या आधारावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविड -19 लशीसाठी आणीबाणी परवान्यासाठी अर्ज करू शकणार आहे. या लशीच्या सुरक्षेबाबत सध्या कोणताही प्रश्न नाही. मात्र दीर्घकाळ काय परिणाम होतात ते समजण्यासाठी किमान 2 ते 3 वर्षांचा वेळ जावा लागेल असंही ते म्हणाले.

डिसेंबरपर्यंत कोरोनाची लस येईल मात्र त्यासाठी इमरजन्सी ही लस वापरण्यासाठी परवाना मिळणं आवश्यक आहे. जर ही परवानगी मिळाली नाही तर कोरोनाची लस जानेवारीपर्यंत भारतीयांसाठी उपलब्ध होऊ शकते. सर्व मानवी चाचण्या पूर्ण केल्यानंतर जानेवारीत ही लस येईल अशी माहिती देखील पूनावाल यांनी दिली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 30, 2020, 7:49 PM IST

ताज्या बातम्या