मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

maharashtra corona case : राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण वाढले, पण मृतांची संख्याही वाढली

maharashtra corona case : राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण वाढले, पण मृतांची संख्याही वाढली

'कर्मचारी सखी' साधतात महिला रुग्णांशी संवाद

'कर्मचारी सखी' साधतात महिला रुग्णांशी संवाद

राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांची 66,191 वर पोहोचली आहे. तर 61 हजार रुग्ण बरे झाले आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 25 एप्रिल : राज्याला कोरोनाने (maharashtra corona case) विळखा घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित (corona patient) रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तर दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांची 66,191 वर पोहोचली आहे. तर 61 हजार रुग्ण बरे झाले आहे.

राज्य सरकारकडून गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे.

मुलगी झाली हो! मुलीच्या जन्माचा असाही सोहळा; हेलिकॉप्टरमधून चिमुकलीला आणलं घरी

गेल्या 24 तासांत 61,450 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 35,30,060 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.  त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.19 एवढे झाले आहे.

'कोरोना संकटकाळात मोदींच्या एका हाकेला धावून आले सगळे भारतीय उद्योजक' - CAIT

आज राज्यात 66 , 191 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 832 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के एवढा आहे. राज्यात 42,36,825 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 29,966 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 6,98,354 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

First published: