Home /News /mumbai /

COVID-19: राज्यात कोरोनाचा उद्रेक, रूग्णसंख्या 10 लाखांवर; दिवसभरात 24,886 नवे पेशंट

COVID-19: राज्यात कोरोनाचा उद्रेक, रूग्णसंख्या 10 लाखांवर; दिवसभरात 24,886 नवे पेशंट

तर दिवसभरात 505 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर दिवसभरात 505 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिवसभरात 393 जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात 14804 जणांना डिस्चार्ज मिळाला.

  मुंबई 11 सप्टेंबर: राज्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 24 हजार 886 रूग्ण आढळले आहे. त्यामुळे रूग्णांची एकूण संख्या ही 10 लाख 15 हजार 681 एवढी झाली आहे.  दिवसभरात 393 जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात शुक्रवारी 14804 जणांना डिस्चार्ज मिळाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.83वर गेला आहे. राज्यात सध्या 2 लाख 71 हजार 566 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रमुख शहर आणि सर्वाधिक Active रूग्ण मुंबई - 27642 पुणे - 72835 ठाणे - 28688 देशातही रुग्णांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. एकाच दिवसात तब्बल 96 हजार 551 नवीन रुग्णांची नोंद झाली. नवीन कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता लवकरच देशात 1 लाख रुग्ण संख्याही नोंदवली जाऊ शकते. एवढेच नाही तर आज 1209 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 45 लाख 62 हजार 414 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 9 लाख 43 हजार 480 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 76 हजार 271 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 35 लाख 42 हजार 663 लोकं निरोगीही झाले आहेत. ट्रायल न करताच 40 हजार लोकांना लस देणार रशिया, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता देशात सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, ICMR ने केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सेरो सर्वेक्षणांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरूवातीला, 0.73% प्रौढ म्हणजेच तब्बल 64 लाख (64,68,388) लोक कोरोना विषाणूच्या धोक्यामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हादरवणारे आकडे! पुण्यात पुन्हा एकदा सर्वोच्च संख्या; 24 तासांत 3000 नवे रुग्ण सर्वेक्षणानुसार, प्रत्येक RT-PCR चाचणीत एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर येत होतं. त्यावेळी 82-130 अशी संक्रमणाची प्रकरणं समोर होती. कोरोनाची ही अवस्था तेव्हा होती जेव्हा देशभर लॉकडाऊन होतं.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या