राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 14 लाख 60 हजारांवर, जाणून घ्या COVIDचे सर्व अपडेट्स

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 14 लाख 60 हजारांवर, जाणून घ्या COVIDचे सर्व अपडेट्स

राज्यात आज 6,059 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 45 हजारांवर गेली आहे.

  • Share this:

मुंबई 25 ऑक्टोबर: राज्यात कोरोना रुग्णांचा घसरलेला आलेख अजुनही कायम आहे. रविवारी राज्यात 5,648 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 14,60,755 झाली आहे. तर राज्यात आज 6,059 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 45 हजारांवर गेली आहे. राज्याचा Recovery rate 88.8वर गेला आहे. तर 112 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे.

भारतात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या 55 हजारांपेक्षा कमी आढळली आहे. तर मृत्यू संख्या 500 ते 600च्या दरम्यान असल्याने देशातला कोरोनाचा आलेख घसरणील लागल्याचा अंदाज व्यकत होतो आहे.

शनिवारी देशात 50,129 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 78,64,811 झाली असून मृत्यूचा आकडा हा 1,18,534 एवढा झालाय.

देशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही 7 लाखांपेक्षा कमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी अशीच परिस्थिती राहिल्याने देशाचा रिकव्हरी रेट हा 90 टक्के झाला आहे.

देशात सध्या 6,68,154  रुग्णांवर उपचार सुरू आहे. एकूण रुग्णसंख्येत त्याचं प्रमाण हे 8.50 टक्के एवढं आहे. देशात 70,78,123 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातला कोरोनामुक्तीचा दर 90 टक्के असून मृत्यचं प्रमाण हे 1.51 एवढं झालं आहे.

7 ऑगस्टला देशातल्या रुग्णांची संख्या 20 लाखांपेक्षा जास्त झाली होती. 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला  40 लाख झाली होती. 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख तर 11 ऑक्टोबरला 70 लाखाच्या पुढे गेली होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 25, 2020, 8:41 PM IST

ताज्या बातम्या