मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 85 टक्क्यांवर, मृत्यू संख्या मात्र वाढलेलीच

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 85 टक्क्यांवर, मृत्यू संख्या मात्र वाढलेलीच

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मोठ्या शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स आणि हॉस्पिटल्सची सुविधा निर्माण केल्याने तातडीने उपचार केल्या गेलेत.

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मोठ्या शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स आणि हॉस्पिटल्सची सुविधा निर्माण केल्याने तातडीने उपचार केल्या गेलेत.

राज्यात दिवसभरात 11 हजार 447 नव्या रुग्णांचं निदान झालं. तर 306 जणांचा मृत्यू झालं. मृत्यूचं प्रमाण 2.63 टक्के एवढं झालं आहे.

मुंबई 16 ऑक्टोबर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली ही. ही वाढ कायम असून आता कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 85 टक्क्यांच्या वर गेलं आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र घट होताना दिसत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी दिवसभरात 13 हजार 885 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 13 लाख 44 हजार 368 एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.3 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात दिवसभरात 11 हजार 447 नव्या रुग्णांचं निदान झालं. तर 306 जणांचा मृत्यू झालं. मृत्यूचं प्रमाण 2.63 एवढं झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 79,89, 693 चाचण्यांपैकी 15 लाख 76 हजार 062 म्हणजे 19.73 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या एकूण 1 लाख 89 हजार 715 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान,  'माझं कुटुंबं, माझी जबाबदारी' या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून 'पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार', या अभियानाला पुणेकरांनी साथ द्यावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आवाहन केलं. अजित पवारांच्या हस्ते पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप करण्यात आलं.

दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही, दिवाळीनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा आढावा घेण्यात येईल, दिवाळीआधी शाळा सुरू होणार नसल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

कोरोनाबाबत (Coronavirus) अनेक संशोधन जगभरातील विविध भागात केले जात आहे. यावर लस शोधताना कोरोनाबाबतच्या इतर बाबींमध्ये देखील रिसर्च केला जात आहे. दरम्यान कोव्हिड-19 बाबात काही माहिती या संशोधनातून समोर येते आहे. दरम्यान नुकत्याच एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, अन्य काही व्याधी असणाऱ्यांना कोरोनाची लागण लवकर होत आहे.

त्याचप्रमाणे असे आजारपण असणाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे. अन्य व्याधी असलेल्या लोकांचे कोरोनामुले अधिक प्रमाणात मृत्यू होत असल्याचे पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसीनच्या ( Penn State College of Medicine) संशोधकांना आढळले आहे.

First published: