Elec-widget

कार वापरणाऱ्यांमध्ये मुंबईकरांचा असाही रेकॉर्ड, वाहतूक कोंडीचं काय?

कार वापरणाऱ्यांमध्ये मुंबईकरांचा असाही रेकॉर्ड, वाहतूक कोंडीचं काय?

आधीच वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबई शहरात खासगी कारची संख्या वेगानं वाढत आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : देशातल्या प्रमुख शहरांमध्ये कारची संख्या वेगानं वाढत आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई त्यात सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळं वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईची कोंडी वाढत आहे.

आधीच वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबई शहरात खासगी कारची संख्या वेगानं वाढत आहे. गेल्या तीन वर्षात मुंबईच्या रस्त्यावर कारची संख्या तब्बल 23 टक्क्यांनी वाढली आहे.

मार्च महिन्यात शहरात कारची संख्या प्रति किमी 510 इतकी होती. मुंबईच्या खालोखाल पुण्यात ही संख्या 359, कोलकाता-319, चेन्नई- 297,तर बंगळुरू -149 इतकी होती.

वाहतूक कोडीमुळं त्रस्त असलेल्या दिल्लीत ही संख्या 108 इतकी आहे. गेल्या 8 वर्षात मुंबईच्या रस्त्यावरील वाहनांच्या संखेत 82%ची वाढ झाली आहे.

कारमध्ये देशात मुंबई अव्वल

Loading...

3 वर्षांत कारच्या संख्येत 23% वाढ

मुंबई - प्रति किमी 510 कार

पुणे - प्रति किमी 359 कार

कोलकाता - प्रति किमी 319 कार

चेन्नई - प्रति किमी 297 कार

बंगळुरू - प्रति किमी 149 कार

दिल्ली - प्रति किमी 108 कार

विशेष म्हणजे, त्यात खासगी कारचा वाटा 72 टक्के इतका आहे. चारचाकी प्रमाणेचं दुचाकी वाहनांच्या संखेत 95 टक्केची वाढ झाली आहे. मुंबईतील रस्त्याचा अर्धाभाग वाहनांनी व्यापून टाकला आहे.

मुंबईतील बेस्ट बस वेळेवर पोहोचत अशी ख्याती आहे. पण, वाढत्या वाहनांच्या संख्येमुळं बेस्ट बसचा वेगही मंदावला आहे. वाहनांची संख्या अशाच प्रकारे वाढत राहिल्यास वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Nov 19, 2019 11:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...