Home /News /mumbai /

फडणवीस-शिंदे यांच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला! 'या' तारखेला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

फडणवीस-शिंदे यांच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला! 'या' तारखेला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

  मुंबई, 29 जून : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करायची की, पदावरुन पायउतार व्हायचं हे दोनचं पर्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होते. शेवटी आज (Chief Minister Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याची (Chief Minister Uddhav Thackeray resigns) घोषणा केली. यानंतर आता भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. 1 जुलैला होणार नवीन सरकार स्थापन उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे निम्म्याहून अधिक आमदार सोबत आहेत. त्यामुळे भाजपसोबत सत्ता स्थापन करताना शिंदे गटाला काय मिळणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. यापूर्वी माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी असतील. शिंदे यांच्यासोबत प्रहार संघटनेचे दोन आमदारांसह काही अपक्ष आमदारही आहेत. त्यामुळे सत्तेचा वाटा कसा होणार? याबद्दल तर्तवितर्क लढवले जात आहेत.

  Big News : महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर हादरा! ठाकरे सरकार कोसळलं, अखेर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!

  मुख्यमंत्र्यांकडून राजीनाम्याची आधीच पूर्वकल्पना दरम्यान, 22 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. यावेळीच ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांना कायदेशीर बाबी करण्यात रस नव्हता. मात्र शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं होतं. आजही कॅबिनेट बैठकीपूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यांमध्ये फोनवरुन संभाषण झालं होतं. त्यामुळे कॅबिनेट बैठकीनंतर ठाकरे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी उद्धव ठाकरेंना कोणताही मोठा निर्णय घेऊ नका असं सांगितलं होतं. मात्र पक्षात फूट पडल्यानं उद्धव ठाकरे नाराज झाले होते. आज सकाळी त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटाला मानसिक आवाहन करणारं पत्रही लिहिलं होतं. यात त्यांनी सर्व शिवसैनिकांनी परता असं नमूद केलं होतं.
  Published by:Rahul Punde
  First published:

  पुढील बातम्या