• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • कृषी विधेयकांवर मोदी सरकारला पाठिंबा नाही, राष्ट्रवादीने पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका

कृषी विधेयकांवर मोदी सरकारला पाठिंबा नाही, राष्ट्रवादीने पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका

'केंद्र सरकारने एका राज्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कांदा निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.'

  • Share this:
मुंबई 21 सप्टेंबर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकावरून देशभर राजकारण तापलेलं आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाने या विधयेकाला विरोध केला आहे. महाराष्ट्रात या विधेयकावर राष्ट्रवादीची काय भूमिका आहे याबाबत विचारणा होत होती. राष्ट्रवादी यावर शांत का आहे, पक्षाध्यक्ष शरद पवार हे या विधेयकावर का बोलत नाहीत असे अनेक प्रश्न विचारले जात असतांनाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या विधेयकासंदर्भात सोमवारी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. बाजार समित्यांचे अधिकार कमी करण्याचं काम या विधेयकामुळे होणार आहे. बाजार समित्या ज्या पद्धतीने संरक्षण देतात तसे संरक्षण आता कोण देणार असा आमचा सरकारला सवाल आहे. या विधेयकावर राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारने एका राज्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कांदा निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी आपला माल कुठेही विकावा अस कायदा करतात आणि दुसरीकडे कांदा निर्यात बंदी करतात हा दुटप्पीपणा आहे अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, मोदी सरकार MSP (Minimum Support Price) वस्तूंची हमी भावाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये याबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.  2020-21 च्या रब्बी हंगामात हमी भावाला मंजुरी देण्याची शक्यता आहे. मोदी सरकारवर शेतकरी का चिडले आहेत? नवीन कृषी विधेयकाला का होतोय विरोध? जर हा निर्णय झाल्यास गहू, जवसाच्या हमीभावात मोठी वाढ होऊ शकते तर कडधान्याच्या हमीभावात तब्बल 7.4 टक्क्यांची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृषीमूल्य आयोगाची गव्हाच्या किमतीत वढ करण्याची शिफारस     केली आहे. गव्हाची हमीभावात वाढ करण्याचा मोठा निर्णय़ होऊ शकतो. उत्तर भारतात शेतकरी विधेयकाला असलेल्या निर्णयाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होण्याची चिन्ह आहे. बँकिंग सेक्टरमध्ये मोठ्या बदलाची गरज; रघुराम राजन, विरल आचार्यांनी सुचवले पर्याय गव्हाला 85 रुपये प्रति क्विंटल भाव वाढीची शिफारस करण्यात आली आहे. गव्हाला एमएसपी 2019 - 20 मध्ये 1840 रुपये प्रति क्विंटल भाव होता. तो वाढवून 1925 रुपये प्रति क्विंटल करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. हरभऱ्याच्या भावात 255 रुपये वाढ करून  4875 रुपये प्रति क्विंटल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सर्वात जास्त हमी भाववाढ ही दाळींमध्ये करण्यात आली आहे. 7.3 टक्के इतकी वाढ करण्याची शिफारस यात करण्यात आली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: