मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत कोरोनाची लस घेतल्याच्या दीड तासात ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू; पालिकेने घेतला मोठा निर्णय

मुंबईत कोरोनाची लस घेतल्याच्या दीड तासात ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू; पालिकेने घेतला मोठा निर्णय

काल 68 वर्षीय व्यक्तीने मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात ही लस घेतली होती. त्यानंतर ते बेशुद्ध झाले

काल 68 वर्षीय व्यक्तीने मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात ही लस घेतली होती. त्यानंतर ते बेशुद्ध झाले

काल 68 वर्षीय व्यक्तीने मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात ही लस घेतली होती. त्यानंतर ते बेशुद्ध झाले

  • Published by:  Meenal Gangurde
 मुंबई, 9 मार्च : कोरोनाची लस घेतल्यानंतर 8 मार्च 2021 रोजी एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई महापालिकेने तज्ज्ञांची एक समिती नेमली असून या व्यक्तीचा मृत्यू कोविशिल्ड ही लस घेतल्याने झाला का? किंवा त्यामागे आणखी कोणती कारणं आहेत, याचा तपास केला जाईल. काल 68 वर्षीय व्यक्तीने एका खाजगी रुग्णालयात ही लस घेतली होती. त्यानंतर ते बेशुद्ध झाले आणि नंतर काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला होता. 8 मार्च 2021 रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एका खाजगी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात 'कोविड-19' लसीकरण सुरू असताना वय वर्षे 68 असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीस दु. 3.31 च्या सुमारास कोविशिल्ड या लशीची मात्रा देण्यात आली होती. लशीची मात्रा दिल्यानंतर ते बेशुध्द झाले. यामुळे त्यांना तातडीने आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक असलेले औषधोपचार करुन त्वरीत त्याच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पुढील औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू दुर्दैवाने सायं. 5.05 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. हे ही वाचा-Corona Vaccine घेतल्यानंतर तीन नवे साइड इफेक्ट्स आले समोर; चिंतेची बाब आहे का? सदर बाब पोलीस यंत्रणेला कळविण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शवविच्छेदनाकरीता जे.जे. रुग्णालय येथे पाठविण्यात आले. जेष्ठ नागरिक असणाऱ्या सदर व्यक्तीचे शवविच्छेदन आज 9 मार्च 2021  रोजी केले जाणार आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अत्यंत आवश्यक  बाब म्हणून लसीकरणानंतर घडणाऱ्या प्रतिकूल घटनेबाबतची चिकित्सा (Causality assessment) करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकिय समिती गठीत करण्यात आली असून समितीची त्वरित बैठक आयोजित करण्यात येणार असून ही समिती मृत्यू बाबतची कारणमिमांसा करणार आहेत.
First published:

Tags: BMC, Corona, Corona hotspot, Corona vaccination, Covid19, Maharashtra, Mumbai

पुढील बातम्या