• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मोबाईल चोराने घेतला चावा, ब्लेड ने वार करून लांबविला मोबाईल आणि पैसे

मोबाईल चोराने घेतला चावा, ब्लेड ने वार करून लांबविला मोबाईल आणि पैसे

मोबाईल मिळत नसल्याचे पाहताच त्यांनी रागाच्या भरात पंकज याचा चक्क चावा घेत ब्लेड ने त्याच्यावर वार केले.

  • Share this:
ठाणे 18 जानेवारी : चोरी करतांना चोर कोणत्याही थराला जातात हे आपण आजपर्यंत पाहिले होते परंतु चोरांनी पीडित व्यक्तीला छावा घेण्याचा अजब प्रकार मुंब्रा येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकापासून कल्याणच्या दिशेला काही अंतरावर मुंब्रा इथला पंकज सोनकर हा 23 वर्षीय युवक काही कामाकरिता गेला असता त्याला निलेश गवळी आणि हुसेन मस्तान शेख या चोरांनी पकडले. हे दोघेही मुंब्र्यातीलच संजयनगर येथील रहिवासी असून दोघांनी पंकज कडील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु पंकज याच्याकडून मोबाईल मिळत नसल्याचे पाहताच त्यांनी रागाच्या भरात पंकज याचा चक्क चावा घेत ब्लेड ने त्याच्यावर वार केले. जखमी पंकज कडून मग त्याचा दहा हजार किमतीचा मोबाईल आणि दहा हजार रोख घेऊन त्यांनी पोबारा केला. जखमी पंकजने त्वरित मुंब्रा रेल्वे स्थानक गाठले वर तेथील RPF चे उप निरीक्षक ए के यादव यांना घडला प्रकार सांगितला. यादव यांनी आधी पंकज वर प्रथमोपचार करून घेतले वर त्याला घेऊन रेल्वे स्थानक गाठले. तेथे येताच पंकज याला निलेश गवळी हा आरोपी फिरताना दिसला. आरपीएफ जवानांनी त्याला पकडून त्याचा दुसरा साथीदार हुसेन शेख याचा ठावठिकाणा जाणून घेतला व दोघांनाही अटक केली. अबब...व्यापाऱ्यांची बनवेगीरी, GST अधिकाऱ्यांनी जप्त केले 25 कोटींचे हिरे पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत केला परंतु दहा हजारांची रक्कम मात्र जप्त करण्यात पोलिसांना अपयश आले. दोन्ही आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत धाडले आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: