07 मे : मित्रांच्या मदतीन मुलानंच आपल्या मानलेल्या आईचा गळा आवळून हत्या केल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. आईची आपल्यासोबत वर्तणूक चांगली नसल्याचा राग मनात ठेऊन ही हत्या करण्यात आली आहे.
हत्येनंतर ओळख पटू नये यासाठी या महिले चेहरा ऍसिड टाकून विद्रृप करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी मुलगा बंगळूरला पळून गेला. मात्र तु्र्भे एमआयडीसी पोलिसांनी या आरोपीला बंगळूरमधून अटक केली आहे.
नवी मुंबईतील वाशी गावा लगत एका लोखंडी पेटीत महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी या आरोपींनी चेहऱ्यावर ऍसिड टाकलं होतं. पण पोलिसांनी मात्र याचा तपास केला आणि आरोपीला अटक केली आहे.
आपल्या मानलेल्या आईची वर्तणूक आपल्यासोबत चांगली नाही, नेहमी टोचून बोलत असते याचा रागा मनात ठेवून या मानलेल्या मुलाने ही हत्या केली असल्याचे तपासात उघड झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mother, Murder, Navi mumbai, आईची हत्या, नवी मुंबई, वाशी गाव