'युती'च्या फॉर्म्युल्यावर मुंबईत होणार बैठक, अंतिम निर्णय अमित शहांच्या हाती

युतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय मात्र दिल्लीत अमित शहा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 07:22 PM IST

'युती'च्या फॉर्म्युल्यावर मुंबईत होणार बैठक, अंतिम निर्णय अमित शहांच्या हाती

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 5 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीत 'युती' होणार हे आता नक्की झालंय. त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता आहे ती जागावाटपाची. समसमान जागावाटप हे ठरलेलं असलं तरी भाजपचाच वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. 'युती'च्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा यांची लवकरच मुंबईत बैठक होणार आहे. युतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय मात्र दिल्लीत अमित शहा  घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांदरम्यान जागावाटपाची पहिली फेरी पार पडली असून त्यात इतर घटक पक्षांना18 जागा देण्यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली असल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. या दोन्ही पक्षांमध्ये 270 जागांपैकी किती जागा वाटून घ्यायच्या आहेत यावर चर्चा होणार आहे. भाजपला  160 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत पण शिवसेना मात्र 160 जागांपेक्षा जास्त जागा भाजपला देण्यासाठी तयार नाहीये. तर स्वत:साठी शिवसेनेला 110 पेक्षा कमी जागा अमान्य आहेत.

दगाबाजीचे पुरावे द्या, सुप्रिया सुळेंचं हर्षवर्धन पाटलांना थेट आव्हान

त्यामुळे चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर सध्यातरी 16011018 असा 288 जागांचा फॉर्म्युला तयार होताना दिसतोय. अर्थातच हा फॉर्म्युला अंतिम नाहीये. यावर चर्चेच्या आणखी काही फेऱ्या बाकी आहेत. त्यानंतर अंतिम जागावाटप ठरणार आहे. कालच्या या बैठकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांनी चर्चा केली.

काँग्रेसची यादी 'या' तारखेला जाहीर होणार

Loading...

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या छाननी समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जवळपास 66 नावांवर  अंतिम निर्णय घेण्यात आला. येत्या 10 सप्टेंबरला या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत सेवाग्राम किंवा धुळ्यामधून फुटण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर दक्षिणच्या 'आखाड्या'त रंगणार पाटील विरुद्ध महाडीक असा सामना!

काँग्रेस 138, राष्ट्रवादी 138, आणि 12 जागा मित्रपक्षांना देण्याबाबत चर्चा. मित्र पक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस आपल्या खात्यातील जागा सोडण्यास तयार आहे. 10 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची चर्चा देखील पूर्ण होणार असून त्याच दिवशी छाननी समितीची पुन्हा बैठक होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...