मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मविआला मिळणार नवा भिडू? उद्धव ठाकरे आणि आंबेडकरांची बैठक संपली

मविआला मिळणार नवा भिडू? उद्धव ठाकरे आणि आंबेडकरांची बैठक संपली

आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 05 डिसेंबर : 'शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अॅड प्रकाश आंबेडकर यांची बैठक संपली आहे. या बैठकीत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र करण्यासाठी महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील फोर सिझनमध्ये ही बैठक पार पडली. दोन्ही नेत्यांची बैठकही महत्त्वाची मानली जात आहे. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे.

(निवडणूक कधीही घेतली तरी...; केसरकरांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात)

विशेष म्हणजे,काही दिवसांपूर्वी 'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एका मंचावर आले होते.  यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की आज एक प्रकारे कौटुंबिक रूप पाहायला मिळत आहे. दोन नातू एकत्र आलेत. रामदास आठवले असे बोलले होते की तुम्ही प्रबोधनकरांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. प्रकाश आंबेडकर यांना भेटताना वेळ काढावा लागतो. आमचे वैचारिक व्यासपीठ एक आहे. दोन विचारांचे वारसे पुढे घेऊन जात आहोत, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं. या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

(अगं बाई सूनबाई, सासू विरोधात रक्षा खडसे लागल्या प्रचाराला, जळगावात एकच चर्चा!)

तर 'एकत्र कधी येणार आहोत, याचा प्रश्न आला आहे, निवडणुका कधी होतात यावर आम्ही निर्णय घेणार आहोत. ताबतोब जर निर्णय झाला तर चांगलं आहे, आता झाला तर चांगलाच आहे' अशी सूचक प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली होती.

First published: