...त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पवारांकडे बोलून दाखवली नाराजी, 'हे' होते बैठकीतील तणावपूर्ण मुद्दे

...त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पवारांकडे बोलून दाखवली नाराजी, 'हे' होते बैठकीतील तणावपूर्ण मुद्दे

महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवार यांच्यावर तिन्ही पक्षांना एकत्र सांभाळण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे.

  • Share this:

मुंबई, 07 जुलै : कोरोनाशी सामना करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या निर्णयांमुळे वाद पेटला होता. अखेर त्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यात आली असल्याचं कळतंय.

महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवार यांच्यावर तिन्ही पक्षांना एकत्र सांभाळण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यातच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत  अनिल देशमुख आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थितीत होते.

UGCचा राज्य सरकारला दणका, परीक्षा घेण्यास दिली परवानगी

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झाले नसले तरी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून उद्धव ठाकरे नाराज झाले होते. त्यांची नाराजी आता दूर करण्यात आली आहे.राज्यातील कोणत्याही अधिकाऱ्याची बदली ही मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने होत असते. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. त्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदली करण्याआधी मुख्यमंत्र्यांना कळवण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.

तर दुसरीकडे नगर जिल्ह्यात पारनेरमध्ये शिवसेनेचे 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या पाच नगरसेवकांच्या प्रवेशामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाहीतर हे पाच नगरसेवक परत पाठवा असा निरोपही सेनेकडून देण्यात आला होता. पण, याबद्दल अधिकृत अशी कोणतीही माहिती पुढे आला नाही. तर पारनेर पंचायत समितीत शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली, सेनेच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले होते. या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

'कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुंबईनं केलेल्या या चुका पुण्यानं टाळाव्यात अन्यथा...'

विशेष म्हणजे, अलीकडेच भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत देऊन राष्ट्रवादीनेच सत्ता स्थापन करण्यासाठी होकार दिला होता, असा खुलासा केला होता. महाविकास आघाडीमध्ये नाराजीचे सूर उमटल्यामुळे भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी प्रस्ताव देत असल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे कमालीचे अस्वस्थ झाले होते, याबद्दल त्यांनी आपली नाराजी  शरद पवार यांच्याकडे बोलून दाखवली.

एकंदरीत काही मुद्यांवरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरली होती. त्यावर शरद पवार यांनी बैठक घेऊन झालेल्या वादावर पडदा टाकला आहे.

संपादन - सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 7, 2020, 9:38 AM IST

ताज्या बातम्या