राज्याचा Recovery Rate गेला 88 टक्क्यांच्या पुढे, सलग 10व्या दिवशीही COVID रुग्णांमध्ये घट

राज्याचा Recovery Rate गेला 88 टक्क्यांच्या पुढे, सलग 10व्या दिवशीही COVID रुग्णांमध्ये घट

राज्यात दिवसभरात 7 हजार 539 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर 198 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.64 टक्के एवढा झाला आहे.

  • Share this:

मुंबई 22 ऑक्टोबर: गेल्या 8 महिन्यापासून कोरोनाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी गेल्या काही दिवसांपासून येत असलेली आकडेवारी काहीशी दिलासा देणारी आहे. राज्याचा Recovery Rate हा 88 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी 16 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्य ही 16 लाख 31 हजार 856 एवढी झाली आहे. राज्यात दिवसभरात 7 हजार 539 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर 198 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.64 टक्के एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 84 लाख 2 हजार 559 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 25 हजार 197 म्हणजे 19.34 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  राज्यात आत्तापर्यंत 42 हजार 831 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी काय होती स्थिती?

बुधवारी दिवसभरात उच्चांकी 23,371 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 14,15,679 एवढी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 87.51 टक्के एवढा होता.  8,142 नवे रुग्ण सापडले. तर 180 COVID-19 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर 2.64 एवढा होता.

एकूण घेतलेल्या 83,27,493 चाचण्यांपैकी 16,17,658 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. म्हणजे हे प्रमाण 19.43 टक्के एवढं आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घट कायम असून बुधवारी शहरातल्या Active रुग्णांची संख्या ही 8 हजारांवर आली होती.

फक्त मास्क आणि सॅनिटायझर नाही कोरोनापासून बचावासाठी दातही घासा!

दरम्यान, भारतात सुरू असलेल्या कोरोना लशीच्या (Corona Vaccine) ट्रायलकडे प्रत्येकाचे डोळे लागून राहिले आहेत. अशात आता भारतातील पहिली स्वदेशी कोरोना लशीबाबत आनंदाची बातमी समोर येत आहे.

भारत बायोटेकने (Bharat Boiotech) तयार केलेली कोवॅक्सिनचं (Covaxin) आता तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू होणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI - Drug controller general of india) तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी दिली आहे.

पुढील महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू होणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि आसाममध्ये हे ट्रायल करण्याचा विचार आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसमध्ये 25 हजार पेक्षा जास्त लोकांचा समावेश केला जाऊ शकतो. या लोकांना 28 दिवसांत लशीचे दोन डोस दिले जातील.

भारताच्या Dr Reddy's वर सायबर अटॅक; रशियन लशीच्या ट्रायलला मंजुरी मिळताच अडचण

फेब्रुवारीपर्यंत या लशीच्या शेवटच्या टप्प्यातील ट्रायलचे परिणाम येण्याची आशा आहे. सर्व काही सुरळीत असेल तर लगेच लशीला परवानगी देऊन ही लस बाजारात आणली जाईल.  इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसह (Indian council of medical research)  भारत बायोटेकने तयार केलेली ही लस आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 22, 2020, 7:50 PM IST

ताज्या बातम्या