Home /News /mumbai /

BIG NEWS: राज्यात 3 महिन्यात पहिल्यांदाच COVID रुग्णांच्या मृत्यूचा आकडा सर्वात कमी

BIG NEWS: राज्यात 3 महिन्यात पहिल्यांदाच COVID रुग्णांच्या मृत्यूचा आकडा सर्वात कमी

 त्यानंतर अवघ्य 8 दिवसांत म्हणजे दिनांक 5 नोव्हेंबरला मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी 51 दिवसांनी वाढून 208 दिवस इतका झाला आहे.

त्यानंतर अवघ्य 8 दिवसांत म्हणजे दिनांक 5 नोव्हेंबरला मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी 51 दिवसांनी वाढून 208 दिवस इतका झाला आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.49 टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर 2.64 एवढा आहे.

    मुंबई 12 ऑक्टोबर: गेली 6 महिने कोरोनाशी निकराची झुंज देणाऱ्या राज्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सोमवारी पहिल्यांदाच रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट झाली असून आज 165 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून ही संख्या 300 ते 400 च्या दरम्यान होती. सोमवारी 15,656 रुग्ण बरे होऊन घरी परतले त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 12, 81, 896 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.49 टक्के एवढे आहे.  तर मृत्यूदर 2.64 एवढा आहे. दिवसभरात राज्यात 70089 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात सध्या 2 लाख 12 हजार 439 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातून दिलासा देणारी माहिती पुढे आली आहे. शहरात सोमवारी गेल्या 4 महिन्यातली निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. दिवसभरात पुण्यात 351 नवे रूग्ण आढळून आलेत तर 950 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. सावधान! मोबाईल वापरताना झालेली 'ही' एक चूक तुम्हाला कोरोनापर्यंत घेऊन जाऊ शकते सलग 15 दिवसांपासून पुण्यात रुग्णवाढीचा आलेख घसरणीला लागला असून ही सकारात्मक गोष्ट असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. शहरात सध्या 12 हजार 285 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 856 क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1,54581 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 3 हजार 844वर गेला आहे. आत्तापर्यंत एकूण 1 लाख 38 हजार 452 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, मार्च महिन्यात भारतातील कोरोनामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आतापर्यंत 1,08,334 जणांचा मृत्यू झाल्याचं भारत सरकारनी रविवारी (11 ऑक्टोबर) जाहीर केलं. दर 100 कोरोनाबाधितांपैकी मरण पावलेल्यांची सरासरी ही एवढा खंडप्राय देश असून आणि दोन नंबरची लोकसंख्या असूनही खूप कमी आहे. कोरोनाच्या काळातील विमान प्रवासात केवळ 44 रुग्ण सापडले पॉझिटिव्ह जॉन हॉफकिन युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या 20 देशांमध्ये ही सरासरी 1.5 टक्के आहे. हाच दर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिकेत 2.8 टक्के आहे. दर एक लाख लोकसंख्येमध्ये मृत्यूंचं अमेरिकेतील प्रमाण 64.74 आहे तर भारतात ते केवळ 7.73 आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या