मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोना चाचण्या आणि उपचारांवरून फडणवीसांनी सरकारवर केले हे गंभीर आरोप

कोरोना चाचण्या आणि उपचारांवरून फडणवीसांनी सरकारवर केले हे गंभीर आरोप

कोरोना टिपेवर असताना माध्यमांमुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे लोक सुरक्षा नियमांचं पालन सक्तीने करत होते.

कोरोना टिपेवर असताना माध्यमांमुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे लोक सुरक्षा नियमांचं पालन सक्तीने करत होते.

'खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड्स कागदावरच घेण्यात आले आहेत. काही मोठ्या रुग्णालयात बेड्स नाही असं दाखवलं जातं आणि मागच्या दरवाज्याने बेड्स दिले जात आहेत.'

मुंबई 6 जून: राज्यात कोरोनावरून गंभीर परिस्थिती आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. अशी परिस्थिती असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार क्षमता असतानाही मुंबई आणि राज्यात कमी चाचण्या करत आहे. केवळ आकडे कमी दाखविण्यासाठी लपवा छपवी करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. रुग्णांना योग्य उपचार मिळत नसून सरकारचे आदेश हे फक्त कागदांवरच आहेत असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, एकट्या महाराष्ट्रात 35 हजार सॅम्पल टेस्ट करू शकतो मात्र आपण फक्त 15 हजार टेस्ट करतोय. मुंबईत कोरोनाच्या अधिक चाचण्या होणं आवश्यक आहे. फक्त आकडे कमी दाखविण्यासाठीच कमी टेस्ट केल्या जात आहेत. जानेवारीत केवळ एक प्रयोगशाळा भारतात होती आता 600 हुन अधिक प्रयोगशाळा आहेत. महाराष्ट्रातल्या फक्त 27 टक्के चाचण्या मुंबईत होत आहेत. बजाज हे ऑटो सेक्टर तज्ज्ञ आहे, मेडीकल किंवा कोरोना तज्ज्ञ नाहीत. ते म्हणतात म्हणूनच ते खरं आहे असं नाही. स्पेनमध्ये काय झालंय तेही समोर येत आहे. खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड्स कागदावरच घेण्यात आले आहेत. काही मोठ्या रुग्णालयात बेड्स नाही असं दाखवलं जातं आणि मागच्या दरवाज्याने बेड्स दिले जात आहेत.  महात्मा फुले जनआरोग्य योजना फक्त रजिस्टर्ड रुग्णालयात लागू केली जात आहे असा आरोपही त्यांनी केला. अशी आपत्ती येते त्यावेळी पैसे उभारावेच लागतील. केंद्राने 75 हजार कोटींचे कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे. आणखी 50 हजार कोटींची रक्कम आपण उभारू शकतो. कासवांना आश्रय देणाऱ्या गावच्या डोक्यावरचं छप्पर उडालं; निसर्गचं थैमान आलं समोर निसर्ग चक्रीवादळावरून सरकारने जी मदत केली आहे त्यावरूनही त्यांनी जोरदार निशाणा साधला,  निसर्ग चक्रीवादळामुळे जे नुकसान झालं त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी मदत जाहीर केली ती अतिशय तोकडी असून सरकारने तातडीने आणखी मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरानंतर त्यावेळी जेवढी मदत करण्यात आली त्याच प्रकारची मदत केली जावी अशी मागणी त्यांनी केली. या भागासाठी जाहीर केलेली 100 कोटींची मदत ही अतिशय अपुरी आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. फडणवीस म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान प्रचंड मोठं आहे. त्यामुळे योग्य ती मदत करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी जेव्हा महापूरात नुकसान झालं तेव्हा आम्ही काही निर्णय घेतलं होतं त्याच प्रकारचे निर्णय घ्या अशी आमची मागणी नाही मात्र सरकारने पुरेशी मदत करावी असं सांगत त्यांनी काही मागण्याही ठाकरे सरकारकडे केल्या. पुण्यात दुकानं उघडण्यास काय अडचण आहे? अजित पवारांनी दिला पोलिसांना दणका एनडीआरएफच्या निकषाने आपण नुकसान भरपाई करतो आणि मग केंद्र सरकार आपल्याला आपण दिलेली रक्कम परत करते. गेल्या वर्षी विशेष जीआर काढून एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त मदत केली होती. तशाच प्रकारची मदत केली पाहिजे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या