आदित्य ठाकरे यांच्या खात्याचं नाव बदललं, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

आदित्य ठाकरे यांच्या खात्याचं नाव बदललं, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटनासोबतच पर्यावरण मंत्रालयही आहे. हा त्यांचा आवडीचा आणि पॅशनचा विभाग असल्याने तो खास त्यांच्याकडे देण्यात आला होता.

  • Share this:

मुंबई 9 जून:  राज्य मंत्रिमंडळातले वजनदार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आवडत्या पर्यावरण विभागाचं नाव आता बदललं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.  पर्यावरण विभागाचे नाव बदलून आता 'पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग' असे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. पर्यावरणात होत असलेले बदल आणि त्याचा सामान्य माणसांवर होत असलेला परिणाम या सगळ्यांची दखल घेत हा मोठा बदल केल्याचं बोललं जातं आहे.

आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटनासोबतच पर्यावरण मंत्रालयही आहे. हा त्यांचा आवडीचा आणि पॅशनचा विभाग असल्याने तो खास त्यांच्याकडे देण्यात आला होता. हा बदलही त्यांच्याच सूचनेनुसार झाल्याची माहिती आहे. राज्य प्लॅस्टिक मुक्त करणं असो किंवा समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा विषय आदित्य ठाकरे यांनी या सर्व विषयांमध्ये मंत्रिमंडळात येण्याआधीपासूनच सक्रिय सहभाग घेतला होता.

या बदलामुळे आता पर्यावरण विभागाचं कार्यक्षेत्र वाढणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वतावरणाच्या बदलाचा अभ्यास आणि त्याचा परिणाम यावर मोठा प्रकल्प राबविण्याची त्यांची इच्छा असल्याचंही बोललं जात आहे.

VIDEO: शरद पवारांनी भाजपला दिली ‘विदुषका’ची उपमा, ते काय म्हणाले ऐका!

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले पाच महत्त्वांचे निर्णय असे आहेत.

  1. शासकीय कला महाविद्यालयांमधील 159 अध्यापकांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता
  2. मराठवाड्यातील 5 कौटुंबिक न्यायालयांना पुढील 5 वर्षांसाठी मंजुरी
  3. वेंगुर्ला येथील मौजे शिरोळा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यास ताज ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनी याना 54.40 हे.आर. जमीन भाडेपट्ट्यावर
  4. पर्यावरण विभागाचे नाव बदलून " पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग" असे करण्याचा निर्णय
  5. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय कंपन्यांच्या कर्जाला शासन हमी.

हे वाचा -

शरद पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा

UNLOCK : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पालिकेकडून सुधारीत नियमावली जाहीर

संपादन - अजय कौटिकवार

First published: June 9, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या