VIDEO : स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांना जनता ठोकून काढते -नितीन गडकरी

'मी स्वप्नं दाखवणारा मंत्री नाही तर मी काम करुन दाखवणारा मंत्री आहे'

News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2019 06:34 PM IST

VIDEO : स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांना जनता ठोकून काढते -नितीन गडकरी

विवेक कुलकर्णी,प्रतिनिधी

मुंबई, 27 जानेवारी : 'स्वप्नं दाखवणारे नेते लोकांना आवडतात, पण स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांना जनताच ठोकून काढते', असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात अभिनेत्री ईशा कोप्पीकर हीने भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना नितीन गडकरींनी पुन्हा एकदा एक सूचक विधान केलं आहे.

"कोणतेही स्वप्न असतं, ते ह्रदयात असतं. कोणतीही सत्ता डोळे वटारू शकते. पण कुणांच्या स्वप्नांना संपवू शकत नाही. स्वप्नांचं आणखी एक विशिष्ट असतं, जी लोकं स्वप्न दाखवत असता, पण ती पूर्ण करत नाही. अशा नेत्यांची जनता धुलाई करते. त्यामुळे स्वप्न असे दाखवा जे पूर्ण करता येऊ शकतात.",असं गडकरी म्हणाले. तसंच 'मी स्वप्नं दाखवणारा मंत्री नाही तर मी काम करुन दाखवणारा मंत्री आहे,' असंही ते म्हणाले.

गडकरींकडून इंदिरा गांधींचं कौतुक

Loading...

गडकरींनी याआधीही अशी विधानं केली होती. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये,  'इंदिरा गांधी यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवलं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं,' असं म्हणत गडकरी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतुक केलं होतं. तसंच याआधी गडकरींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचंही कौतुक केलं होतं.

'विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो'

पुण्यात 22 डिसेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते की, 'अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्त्वानं शिकलं पाहिजे. यशाचे बाप अनेक असतात पण अपयश अनाथ असतो. अपयश आल्यावर कमिटी बसते तर विजयावर आनंद व्यक्त केला जातो. मात्र, अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्त्वानं शिकलं पाहिजे.'

======================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...