मुंबई, 10 डिसेंबर : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्राचा अखेर खुलासा झाला आहे. हे पत्र उरणमधील विजेंद्र म्हात्रे (vijendra mhatre) नावाच्या वकिलांनी पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पत्राबद्दल खुलासा करताना किशोरी पेडणेकर भावुक झाल्या.
वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणावरून महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यात वाद पेटला होता. पण, या प्रकरणाला आज एका धमकी पत्रामुळे धक्कादायक वळण मिळाले. महापौरांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकी पत्राबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पत्रकारांशी बोलत असताना किशोरी पेडणेकर यांनी या पत्राबद्दल धक्कादायक खुलासा केला.
धमकी पत्र सकाळी मला मिळालं. गेली 40 वर्ष राजकारणात असून चारित्र्य जपलं. आज सकाळी एक पत्र मिळालं. या पत्राची भाषा अत्यंत लज्जास्पद आहे. मारून टाकु विटंबना करू, मुलगा आणि नवऱ्याला मारून टाकु तुमच्या अवयवांची विटंबना करू अशी भाषा वापरली, हे अत्यंत किळसवाने होते, असं सांगताना महापौर किशोरी पेडणेकर भावनिक झाल्या.
आता AI नेच भविष्यात होणाऱ्या आजारांबाबत मिळणार माहिती, अभ्यासातून खुलासा
महिलांचा मान आपण राखतो पण आता राजकीय टीका स्तर खालावत चालला आहे. वापरलेले शब्द मला क्लेशकारक आहे विजेंद्र म्हात्रे या नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र उरणमधून पाठवलंय. पोस्टल पनवेलच आहे विजेंद्र म्हात्रे याने हे पत्र लिहिलं असून तो अॅडव्होकेट आहे असे लिहिले आहे, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.
'मला माझा पक्षाच काम महत्त्वाचे आहे परंतु माझे कुटुंब देखिल महत्त्वाचे आहे. या पत्राला मी भीक घालत नाही. याचं काही न काहीतरी कनेक्शन आहे ते पोलीस शोधून काढतील', असंही पेडणेकर यांनी सांगितलं.
सासूच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला अन् 4लाखांचे दागिने झाले गायब, नाशकातील घटना
अतुल भातखळकर यांना आमदार म्हणून काय कळतंय. मला महापौर म्हणून नाही तर महिला म्हणून ते विचार करू शकत नाही. पण बोलून ते महिलांचा अपमान करत आहे. चित्रा वाघ या एका पक्षात होत्या. आता दुसरा घरोबा केला आहे. त्यामुळे त्यांना कळलं पाहिजे आम्ही सुद्धा दुसऱ्याबद्दल आवाज उठविला आहे. चित्रा वाघ यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही. आम्हाला विश्वास रूपाली चाकणकर यांच्यावर आहे, असं म्हणत पेडणेकर यांनी वाघ यांना टोला लगावला.
धक्कादायक म्हणजे, गेल्यावर्षीही महापौर किशोरी पेडणेकर यांना फोनद्वारे धमकी आली होती. त्यावेळी सुद्धा धमकावणाऱ्याने किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.