मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'चाव्या तयार..,मग उशीर कशाला?' शरद पवारांच्या अचानक झालेल्या भेटीनंतर आव्हाडांनी शेअर केला किस्सा

'चाव्या तयार..,मग उशीर कशाला?' शरद पवारांच्या अचानक झालेल्या भेटीनंतर आव्हाडांनी शेअर केला किस्सा

जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्या या अचानक झालेल्या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्या या अचानक झालेल्या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्या या अचानक झालेल्या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई, 10 मे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या भेटीचा एक किस्सा त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. सध्या या किस्स्याची मोठी चर्चा सुरू आहे.

मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय करण्यासाठी म्हाडाकडून घरं उपलब्ध करुन देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाडांनी केली होती. हे आश्वास पवारांच्या लक्षात होतं. त्यामुळे भेट झाल्यानंतर पवारांनी आठवणीने त्याची विचारणा केली. त्यावर आव्हाड म्हणाले, घरे तयार आहे, चाव्याही तयार आहेत. यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मग उशीर कशाला?

नेमका काय आहे तो किस्सा

त्याचं झालं असं की, काल अचानक जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांची भेट झाली. त्यानंतर शरद पवारांनी पहिलाच प्रश्न कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या घराबद्दल विचारणा केली. त्यानंतर आव्हाड म्हणाले की, साहेब घरं तयार आहेत, चाव्याही हातात आहेत. त्यावर पवार म्हणाले की, मग उशीर कशाला? यानंतर आव्हाड म्हणाले की, आपल्या तारखेची वाट पाहतोय. यावर साहेब म्हणाले, ठीक आहे या आठवड्यातच कार्यक्रम करुन टाकू. पहिलं त्यांना घरं दिली पाहिजेत. या घटनेचं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ज्यावर मोठी चर्चा सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Cancer, Jitendra awhad, NCP, Sharad pawar