• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • इस्ज्ञायल दूतावासाने मराठीतून ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केलं अभिनंदन, कारण...

इस्ज्ञायल दूतावासाने मराठीतून ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केलं अभिनंदन, कारण...

'जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे'

 • Share this:
  मुंबई, 29 जून: मुंबईकरांची (Mumbai) तहाण भागवण्यासाठी आता समुद्राचे पाणी गोड होणार आहे. इस्ज्ञायली तंत्रज्ञानाद्वारे समुद्राचे पाणी गोड केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाचं इस्त्रायली सरकारच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे. मुंबईतील इस्रायलच्या दूतावासाने खास मराठीतून ट्वीट करून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प अहवालासाठी मुंबई पालिका आणि इस्रायलच्या IDETechnologies यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प हे क्रांतिकारी पाऊल असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे' असं ट्वीट इस्त्रायलच्या दूतावासाकडून करण्यात आले आहे. Twitter नं हटवला भारताचा चुकीचा नकाशा, जम्मू-काश्मीर आणि लडाख दाखवलेला वेगळा देश मुंबई महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या लोकांना पाण्याचा पुरवठा सातत्यानं होत राहावा यासाठी गेले काही वर्ष नवीन स्त्रोत बदलण्याचा विचार केला जात होता. काही वर्षांपूर्वी समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे आला होता. परंतु, तत्कालीन आयुक्त यांनी हा प्रकल्प फीजीबल नाही, असे सांगून तू विचार मागे टाकला होता. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच काही महिन्यापूर्वी समुद्राचे पाणी गोड करून त्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं होतं, अखेर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. मनोरी, मालाड येथे उभारण्यात येणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये - २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा भविष्यात ४०० दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत विस्तार करण्याची क्षमता मे २०२२ पर्यंत डीपीआर तर २०२५ मध्ये प्रकल्प सुरु होण्याची अपेक्षा. याद्वारे मुंबईकरांना २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी - अनियमित-लहरी पाऊस, वातावरणीय बदल यामुळे मुंबईकरांना दरवर्षी १५ ते २० टक्के पाणी कपातीस सामोरे जावे लागते या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णपणे विश्वासार्ह जलस्त्रोताचा विकास - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मनोरी, मलाड येथे उपलब्ध करून दिलेल्या जागेवर प्रकल्पाची अंमलबजावणी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून कमी जागेत प्रकल्प उभारणी - मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता तुलनात्मकदृष्टीने चांगली असून समुद्राचे पाणी उचलून नि:क्षारीकरण प्रकल्पात आणण्याकरिता तसेच प्रक्रियेनंतरच्या क्षाराच्या निर्गमनाकरिता खुल्या समुद्राची उपलब्धता असलेले हे ठिकाण कांदळवन विरहित आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रापासून दूर आहे. मानवी वस्ती, शेत जमीन, मासेमारी जेट्टी ही दूर असून सर्व निकषांवर पात्र ठरणारी ही जागा नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी योग्य आहे. जास्त पगार की घरात मदत काय हवं? बायकोनेच ठरवावं आता काय हवं - करार झाल्यापासून १० महिन्याच्या कालावधीत सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त होईल. हा प्रकल्प अहवाल तयार करतांना समुद्रशास्त्रीय सर्वेक्षण, भूपृष्ठीय सर्वेक्षण, भूभौतिकशास्त्रीय सर्वेक्षण, पर्यावरण निर्धारण अभ्यास (सागरी व जमिनीवरील), डिफ्युजर, खाऱ्या पाण्याच्या निर्गमनाच्या रचनात्मक बाबींची गणितीक प्रतिकृती, समुद्राच्या पाण्याच्या आदान तसेच क्षाराच्या निर्गमनाचे स्थळ निश्चित करून संकल्प चित्रे तयार करणे, किनारपट्टी नियमन क्षेत्रीय अभ्यास व तद्अनुषंगिक परवानग्या प्राप्त करण्याची कामे हाती घेण्यात येतील.  सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प बांधकामाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सविस्तर निविदा प्रक्रिया राबवून यथायोग्य कार्यवाही केली जाईल.
  Published by:sachin Salve
  First published: